Vidhansabha 2024: निवडणूकीतून सतीश सावंत यांची माघार ; पक्षाच्या हितासाठी घेतला निर्णय
कणकवली/भगवान लोके : शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर आणि भाजपा चे विधानसभा प्रमुख , माजी आमदार राजन तेली यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी या दोघांनीही अहोरात्र मेहनत घेतली होती आणि त्यांच्या समवेतआम्ही सुध्दा काम केलं आहे. नारायण राणेंना पहिल्यांदा निवडून आण्यामध्ये श्री. उपरकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे परशुराम उपरकर , राजन तेली यांचे स्वागत भगवती मंगल कार्यालय येथे 22 ऑक्टोंबरला सकाळी 10.30 वाजता आम्ही करणार आहोत.तसंच कणकवली विधानसभा निवडणूक रिंगणातून पक्ष हितासाठी माघार घेत असल्याची माहिती कणकवली ठाकरे सेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.
हेही वाचा-Chiplun: डेरवण मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रशासनाचा मनमानी कारभार
कणकवली येथे विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी तालुकाप्रमुख कन्हैया पारकर उपस्थित होते . कणकवली विधानसभा मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून चार जण इच्छूक होतो .परंतु यासंदर्भात शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या समवेत मुंबईत काल बैठक झाली. मी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून इच्छूक होतो. परंतु आता राजन तेली यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आता कणकवली विधानसभेसाठी 3 उमेदवार इच्छूक आहेत. त्यांचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बुधवार 23 ऑक्टोंबरपर्यंत घेतील असे, श्री. राऊत यांनी सांगितले आहे. तूर्तास माझा थांबण्याचा निर्णय आहे. पक्षाचा हितासाठी हा निर्णय असून सांघिक कामगिरी या निवडणूकीत असेल. पक्ष संघटनेसाठी हा हिताचा निर्णय आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी अभद्य आहे. कणकवली विधानसभेसाठी जो काही निर्णय वरिष्ठ घेतील त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा-Chiplun हायटेक बसस्थानक बांधकाम लांबणीवर ; प्रवाशांनी व्यक्त केला संताप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंसोबत गावागावांत शिवसेना संघटना बांधण्यामध्ये आम्हा सर्वा जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. पहिल्यांदा 1990 साली नारायण राणे यांचा विजय, त्यानंतर 1997 साली शिवसेनेची जिल्हा परिषद आणण्यासाठी काम केले. आता श्री. उपरकर व तेली या दोघांनीही पक्षात प्रवेश केला आहे, त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला फायदा होईल. त्यांचे स्वागत भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे शिवसेनेच्यावतीने करण्यात येईल. हा कार्यक्रम आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. असे सतीश सावंत यांनी सांगितले.