Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला तुम्ही पहिल्यांदाच बाप्पाचे विसर्जन करत आहात का? जाणून घ्या विसर्जनची पद्धत

अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी 10 दिवसांच्या बाप्पांना भक्तिभावाने निरोप दिला जातो. विसर्जनाची परंपरा ही फक्त पूजेचा शेवट नसून श्रद्धा आणि भावना आहे. काय आहे विसर्जनाची पद्धत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 05, 2025 | 11:49 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

पंचांगानुसार, शनिवार, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या उत्सवाची सुरुवात गणेशोत्सवाच्या दिवशी होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपते. या दिवशी हा उत्सव संपतो. यावेळी भक्त विधीपूर्वक गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. मात्र अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच बाप्पाचे विसर्जन करणार असाल तर त्यामागे काय पद्धत आहे ते जाणून घ्या.

अनंत चतुर्दशी विसर्जनासाठी शुभ मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.12 वाजता होणार आहे. या तिथीची समाप्ती रविवार, 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1.41 वाजता होईल. अनंत चतुर्दशीला पूजा करण्यासाठी शुभ काळ दिवसभर असतो. स्नान आणि ध्यान केल्यानंतर भाविक कधीही लक्ष्मी नारायणजींची पूजा करू शकतात. यावेळी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 6.2 ते 1.41 वाजेपर्यंत आहे.

गणेश विसर्जन करण्याची पद्धत

शेवटची पूजा

विसर्जन करण्यापूर्वी बाप्पाची पुन्हा पूजा करा. त्यांना मोदक, लाडू आणि त्यांच्या आवडत्या पदार्थांचे नैवेद्य दाखवा. त्यानंतर आरती करा आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या” असा जप करा.

Surya Nakshatra: 13 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळतील अपेक्षित यश, सूर्य बदलणार आपले नक्षत्र

क्षमा मागा

जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल बाप्पाची माफी मागा. तुमच्या घरावर आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद राहावेत अशी प्रार्थना करा.

वस्तूंचे विसर्जन करा

मूर्तीसोबत पूजेत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू जसे की फुले, हार, वस्त्र आणि सजावट काढून टाका. या वस्तूचेदेखील विसर्जन करा.

विसर्जनाचे ठिकाण

मूर्तीचे विसर्जन पवित्र नदी किंवा तलावात केले जाणार आहे. हल्ली पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहता घरी कृत्रिम तलाव आणि बादल्यांमध्ये देखील विसर्जन केले जाते. यामुळे तुम्ही गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतींने विसर्जन केले जाऊ शकते.

Palmistry: तळहातावरील या रेषेमुळे समजते चांगले स्थान आणि संपत्ती, कोणती आहे रेषा

विसर्जन

मूर्ती हळूहळू पाण्यात विसर्जित करा. मूर्तीचे विसर्जन करताना पहिले पाण्यात ती तीन वेळा खाली-वर करा. विसर्जन करतानाही बाप्पाचे नाव घेत राहा आणि त्यांना भावनिक निरोप द्या.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व

अनंत चतुर्दशीचा दिवस भगवान विष्णूच्या अनंत रूपाला समर्पित आहे, त्यालाच अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. या दिवशी भक्त विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्या हातावर 14 गाठी असलेले अनंत सूत्र बांधतात. या दिवसाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवाचा शेवट देखील या दिवशी होतो. 10 दिवसांसाठी घरी येणाऱ्या बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Anant chaturdashi 2025 method for immersion of bappa for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • dharm
  • Ganesh Chaturthi 2026
  • religions

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.