फोटो सौजन्य- pinterest
तळहातावर पैशांशी संबंधित रेषा असते त्या रेषेचा संबंध आर्थिक स्थितीशी असतो. या रेषेमुळे आपल्याला तळहाताशी संबंधित गोष्टी समजतात. बऱ्याचदा लोक खूप मेहनत करुनही जास्त पैसे कमावू शकत नाही. काही लोक कमी प्रयत्नातही समृद्धी आणि विलासितापूर्ण जीवन जगतात. ज्योतिष आणि हस्तरेषाशास्त्रानुसार, व्यक्तीच्या कर्मानुसार त्याच्या तळहातावरील रेषा देखील फरकाचे कारण मानले जाते. जर तळहातावरील रेषेचा संबंध आर्थिक स्थितीशी संबंधित असल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते. तळहातावरील पैशाच्या संबंधित कोणती आहे ती रेषा, जाणून घ्या
हस्तरेषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मेंदू रेषेवर कोणत्याही प्रकारचा दोष नसल्यास किंवा तळहातावर शुक्र पर्वत दिसत असल्यास अशा लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. गुलाबी हात, सरळ आणि बारीक बोटे असणारे लोक करोडपती असण्याचे दर्शवले जाते.
तळहातावरील भाग्यरेषा शनि पर्वताच्या तळहाशी असल्यास किंवा एकापेक्षा अधिक रेषा असल्यास ती व्यक्ती केवळ देशातच नव्हे तर परदेशातही मोठा व्यवसाय स्थापित करू शकतात असे दर्शवते. असे लोक अफाट संपत्तीचे मालक बनतात.
ज्या लोकांच्या जीवनरेषा, मेंदू रेषा आणि भाग्यरेषा स्वच्छ असते. त्यासोबतच जीवनरेषेतून बाहेर पडणारी भाग्यरेषा फांद्यांच्या स्वरूपात पसरलेली असते अशा लोकांना संपत्ती आणि सुविधांनी भरलेले जीवन जगतात. अशा लोकांना कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासत नाही.
ज्या लोकांच्या तळहातावर भाग्यरेषा शनि पर्वताच्या खाली संपते आणि मेंदू रेषेजवळ दोन भागात विभागली जाते ज्यापैकी एक मेंदू रेषेला जोडते असे लोक मालमत्ता आणि अफाट संपत्तीचे मालक बनते. अशा लोकांची आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहते.
ज्या लोकांची भाग्यरेषा चंद्र पर्वतापासून सुरू होते. ज्या लोकांचे तळवे जड असतात आणि ज्यांचा अंगठा थोडा मागे वाकलेला असतो, त्यांच्याकडे एक विशेष प्रकारचे ज्ञान असते. असे लोक श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यापारी बनतात. तसेच त्यांच्या प्रतिभेने सर्वकाही मौल्यवान बनवतात.
जर बुध पर्वतापासून निघणारी रेषा शनि पर्वताकडे जात असल्यास ती व्यक्ती व्यवसायात सतत प्रगती करत असल्याचे लक्षण मानले जाते. असे लोक तरुण वयातच एक मजबूत आणि प्रचंड व्यावसायिक साम्राज्य स्थापन करतात. या रेषेमुळे व्यवसायात वाढ होते की नाही हेदेखील समजते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)