फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात अपरा एकादशीला खूप महत्त्व आहे. अपरा एकादशीला अचला एकादशी असे देखील म्हटले जाते. अपरा या शब्दांचा अर्थ अमर्याद किंवा अतिरिक्त असा होतो. अशी मान्यता आहे की, जीवनात व्यक्तीने हे व्रत केल्याने त्याला पुण्य लाभते आणि त्याने केलेली पाप नष्ट होतात. या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. असे मानले जाते की, अपरा एकादशीला हे व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासूनही मुक्तता मिळते. तसेच या व्रताच्या वेळी व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, दान आणि पवित्र स्थळांना भेट दिल्याने त्याचा व्यक्तीला फायदा होतो. या व्रतामुळे धन आणि समृद्धी वाढते. या व्रताच्या पुण्यमुळे पूर्वजांनाही शांती मिळते.
पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवार, 23 मे रोजी पहाटे 1.12 वाजता होईल आणि त्याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजे 23 मे रोजी रात्री 10 वाजता होईल. उद्यतिथीनुसार, एकादशीचे व्रत शुक्रवार, 23 मे रोजी केले जाईल आणि एकादशीचा उपवास सूर्योद्यानंतर सोडला जाईल.
अपरा एकादशीच्या दिवशी धान्य दान करणे शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तांदूळ, गहू, डाळ किंवा इतर धान्य दान करू शकता. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते.
एकादशीला कपड्याचे दान करणेदेखील शुभ मानले जाते. तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करु शकता. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.
अपरा एकादशीच्या दिवशी क्षमतेनुसार पैसे दान करा. हे दान गरीब व्यक्ती, मंदिर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाकरिता करा.
उन्हाळ्यात बूट किंवा चप्पलेचे दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतात.
एकादशीच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी देणे किंवा पाण्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते.
एकादशीला फळांचे दान केल्याने आरोग्य चांगले राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यावेळी तु्म्ही तुमचे आवडते फळ दान करु शकता.
धार्मिक पुस्तकांचे दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होऊन आध्यात्मिक प्रगती देखील होते.
गुळाचे दान केल्याने जीवनात गोडवा येतो.
तूप दान करणे देखील शुभ मानले जाते आणि घरात समृद्धी येते.
अपरा एकादशीच्या दिवशी लोकांनी श्रद्धेने दान करावे. दान करणे हे अधिक फायदेशीर मानले जाते. गरजू व्यक्तीला दान करणे उत्तम मानले जाते. अपरा एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणाऱ्या समस्येतून सुटका होते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)