फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं नवीन घरं बाधावं. नवीन घर बांधण्याचा विचार केला की, त्यासाठी जमीन खरेदी केली जाते. मेहनत करुन लोक घरं बांधतात किंवा खरेदी करतात. दरम्यान काही लोकांचे ते स्वप्न पूर्ण होते तर काहींचे अपूर्ण राहते. बऱ्याचदा घर बांधल्यानंतर लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे वास्तू योग्य नसणे किंवा वास्तू दोष असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार घर बांधताना योग्य दिशेसोबत महिन्यांचा देखील विचार केला पाहिजे. जर चुकीच्या महिन्यात घर बांधले असेल तर ते त्रासदायक ठरु शकते. यामुळे वास्तूच्या नियमांचे पालन करुन घर बांधणे योग्य मानले जाते. कोणत्या महिन्यात घर बांधणे शुभ असते आणि कोणत्या महिन्यात घर बांधू नये त्याचा जीवनावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील 12 महिन्यांपैकी 5 महिने हे घर बांधण्यासाठी शुभ मानले जाते. यामधील वैशाख, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष आणि फाल्गुन हे 5 महिने शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की, या महिन्यात घर बांधल्यास किंवा खरेदी करणे शुभ असते. या महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास घरात सर्व प्रकारचे सुख येते. तसेच वैशाख महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास आरोग्यांच्या समस्या देखील उद्भवत नाही.
श्रावण महिन्यात घर बांधणे सर्वांत शुभ असते. या महिन्यात घर बांधल्याने संपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यात घर बांधल्यास पुत्र, आरोग्य आणि संपत्ती यामध्ये लाभ होतो, असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात बांधकामास सुरुवात केल्यास आर्थिक लाभ होतो, तर फाल्गुन महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास वंश वाढतो, असे म्हटले जाते. काही ग्रथांमध्ये आषाढ महिनादेखील शुभ मानला जातो. दरम्यान, या महिन्यात घर बांधणे प्राण्यांसाठी विनाशकारी आहे.
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, अश्विन, पौष आणि माघ या महिन्यात घर बांधणे अशुभ मानले जाते. चैत्र महिन्यात घर बांधायला सुरुवात केल्यास आजारपण येते, अशी मान्यता आहे. तर ज्येष्ठ महिन्यात घर बांधण्यास सुरुवात करणे म्हणजे संकट आणि मृत्यूचे कारण असू शकते. असे देखील मानले जाते की, भाद्रपद महिन्यात घर बांधल्यास गरिबीचा सामना करावा लागू शकतो, तर अश्विन महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास कुटुंबामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता असते. पौष महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्याने चोरी होण्याची भीती निर्माण होते आणि माघ महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्याने आगीची भीती वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)