
फोटो सौजन्य - Social Media
भीष्मपर्व संपले होते, पाहता पाहता द्रोण पर्वही संपले. कर्णाला कौरवसेनेचा सेनापती म्हणून नेमण्यात आले. पांडवांच्या सैन्याला हरवू शकेल आणि युद्ध आपले नावे करू शकणारा एकाच योद्धा आता कौरवसेनेत शिल्लक होता तो म्हणजे कर्ण! कर्णपर्वाला सुरुवात झाली. दरम्यान, अर्जुनाकडे सारथी म्हणून श्रीकृष्ण आहे म्हणून माझ्याकडेही तसा ज्ञानी आणि हुशार सारथी असणे गरजेचे असल्याचा विचार कर्णाचा होता. कर्णाला सारथी म्हणून राजा शल्य हवा होता पण एका सुतपुत्राचा रथ हाकलण्यासाठी एक राजपुत्र का म्हणून तयार होईल? पण दुर्योधनाच्या कुशल बुद्धीने शल्याला कर्णाचा सारथी म्हणून रणांगणावर पाठवण्यात आले.
कर्ण रणांगणावर येताच युद्धिष्ठिर घायाळ झाला. युद्धिष्ठिराला शिबीराकडे नेण्यात आले. श्रीकुष्णाने अर्जुनाला शीघ्र शिबराकडे जाण्याचे उपदेश दिले पण अर्जुन जाण्यास तयार नव्हता पण पांडवसेनेचा नेताच घायाळ होऊन पडलाय त्याला पाहणेही अर्जुनाचे एक महारथी म्हणून कर्तव्य असल्याचे तसेच बंधू म्हणूनदेखील जबाबदारी असल्याचे श्रीकृष्णाने पार्थला सांगितले आणि तो शिबीराकडे रवाना झाला. शिबिरात अर्जुन आलेला पाहून युद्धिष्ठिर भडकला. रागावून अर्जुनाला अगदी घालून पाडून बोलला. अर्जुनाला म्हणाला की “अर्जुना, तू त्या कर्णाला घाबरून इथे आला आहेस ना!” अर्जुनाने त्याला काळजीपोटी अनेक शब्द वापरले तरी युद्धिष्ठिर त्याला काळजी फक्त निमित्त असल्याचे सांगून कर्णाला घाबरूनच अर्जुन शिबिरात आल्याचे म्हणत होता.
अर्जुनाने बराच काळ त्याचे व्यर्थ बोलणे ऐकले पण युधिष्ठीराने शेवटी अर्जुनाच्या नाजूक नसेवर म्हणजेच गांडीव धनुष्यावर नको ते भाष्य केले मग युद्धिष्ठिराला मारण्यासाठी अर्जुनाने म्यानातून तलवारच बाहेर काढली. तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला अडवले. अर्जुन म्हणाला “माझ्या गांडीव धनुष्याबाबत जो निरर्थक भाष्य करेल, मी त्याचा वध करेल” ही माझी प्रतिज्ञा आहे. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला मारण्यापेक्षा त्याला एकेरी हाक मारण्याचा सल्ला दिला कारण एका महान पुरुषाचा अपमान हा त्या महान पुरुषासाठी मृत्यूसारखाच असतो. तेव्हा अर्जुन युद्धिष्ठिरावर शाब्दिक वार करण्यास सुरुवात करतो.
तो म्हणतो, “हे युद्धिष्ठिरा, तू जुगारी आहेस. भ्याड आहेस आणि भाग्यहीन आहेस. स्वतः जुगार खेळून आम्हाला विवेकबुद्धी पाजतोयस. मी तुझ्यासाठी स्वतःच्या पितामहांना संपवलं. अनेक महारथींचा वध केला. तू काय केलंस अरे?” जन्मापासूनचा राग अर्जुनाने त्यावेळी काढला. एकार्थी ते सत्यच होतं, महाभारतात युद्धिष्ठिराला नम्र, धार्मिक आणि सत्यवादी दाखवण्यात आले आहे पण द्यूत खेळून सगळंकाही हरणारा युद्धिष्ठिरच होता. स्वयंवरात द्रौपदीला जिंकून अर्जुनाने आणले पण तिलाही द्यूताचा डाव म्हणून लावण्यात युद्धिष्ठिराने मागे पुढे पहिले नाही. गंधर्वांनी जेव्हा दुर्योधनाला बंदी केले तेव्हा स्वतःच्या हक्काचे राज्य पुन्हा मिळवण्याची संधी हातात असतानादेखील युद्धिष्ठिराने अर्जुनाला गंधर्वांच्या तावडीतून दुर्योधनाला सोडवून आणण्याचा आदेश दिला. युद्धिष्ठिर त्या युद्धात जरी पांडवांच्या प्रमुख असला तरी प्रमुख पदाची सगळी धुरा, अर्जुनानेच सांभाळली होती.
अर्जुनाने युद्धिष्ठिराला हे सगळं ऐकवलं आणि पुन्हा म्यानातून तलवार उसळली पण स्वतःला ठार करण्यासाठी कारण भावाचा इतका अपमान त्याने केला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःची स्तुती करायला सांगितली कारण वीर पुरुषांनी स्वतःची स्तुती करणे हादेखील एक मृत्यूचं आहे. तेव्हा अर्जुन स्वतःची स्तुती करून शांत होतो आणि युद्धभूमीवर जाऊन त्या दिव्य लढ्याला ‘कर्ण-अर्जुन’ सुरुवात होते.