फोटो सौजन्य- istock
हिंदू परंपरेनुसार, असे म्हटले जाते की मंदिर हे उर्जेचे केंद्र आहे ज्या ठिकाणी शरीर मन आणि आत्मा पूर्ण शुद्धतेने प्रवेश केला पाहिजे. त्याचप्रमाणे चप्पल, बूट हे चिखल, धूळ यांसारख्या अशुद्ध गोष्टींचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. या गोष्टी मंदिरात घालून प्रवेश केल्यास ते अपवित्र मानले जाते. म्हणून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चप्पल बाहेर काढावी. म्हणजेच श्रद्धा, शुद्धता आणि आचरणाची ही पहिली पायरी मानली जाते. मात्र काहीवेळा जाणुनबुजून, कधीतरी नकळत आपल्यांकडून अशा काही चुका होतात की त्यामुळे आपल्या कडील पुण्याची संख्या कमी होते आणि पापांची संख्या वाढते, असे मानले जाते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, जाणून घ्या
असे म्हटले जाते की, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चप्पल काढणे अशुभ आहे त्यामुळे मंदिरातील पवित्रता भंग पावते. मंदिराच्या मुख्यद्वाराच्या पायऱ्याजवळ चप्पल ठेवल्याने जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पवित्र स्थानाची ऊर्जा तेथील सकारात्मकता बिघडते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे चप्पल किंवा बूट मंदिराच्या दरवाजासमोर ठेवणे म्हणजे देवाचा अनादर करणे असे मानले जाते. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि अडथळाविना असणे हे धार्मिकदृष्टिकोनातून चांगले मानले जाते.
बऱ्याचदा लोक मंदिराच्या मुख्यप्रवेशदाराजवळ चप्पल बूट काढतात मात्र असे करणे पूर्णपणे अयोग्य आहे. तुम्ही ज्या ठिकाणी चप्पल काढली आहे त्या ठिकाणी अनेक भाविक येता जाता तुमची चप्पल ओलांडून जाऊ शकतात त्यामुळे त्यांची सर्व दुःख आणि पाप तुमच्या नशिबात येतात. चप्पल बूट अशा ठिकाणी ठेवा की ते कधीही कोणीही ओलांडून जाऊ शकणार नाही.
काहीवेळा जागा अपुरी असल्यास आपण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दुसऱ्यांच्या चप्पलेवर आपली चप्पल ठेवतो हे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, एखाद्याच्या बूट किंवा चप्पलवर पाऊल ठेवणे अशुभ मानले जाते. एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या किंवा पंडिताच्या चप्पलवर पाय ठेवणे अशुभ मानले जाते.
कोणत्याही ठिकाणी चप्पल ठेवताना एखाद्या ठिकाणी बसून स्वतःच्या हाताने उचलून चप्पल ठेवावी
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चप्पल ठेवू नका
दुसऱ्याच्या चप्पल तुम्ही काढू नका
चप्पल ठेवताना सरळ ठेवावी. उपडी पडलेली नसावी.
जर मंदिराच्या आसपास चप्पल स्टॅण्ड असल्यास चप्पल त्यावरच ठेवा इतरत्र टाकू नका
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)