फोटो सौजन्य- pinterest
वाईट नजरेचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. कधीकधी अचानक परिस्थिती बदलायला लागते. मुलांच्या अभ्यासालाही हेच लागू होते. सुरुवातीला मुल खूप चांगला अभ्यास करतात मात्र नंतर त्याचा अभ्यासामधील रस कमी होतो. म्हणजेच अभ्यासापासून दूर जायला लागतात. त्यांना पुस्तकाचे औझे वाटू लागते. काहीवेळा त्यांची चिडचिड देखील होते. कुटुंबातील सदस्यांना असे वाटते की, त्यांचे लक्ष विचलित होत आहे पण तसे नसून ते नजर दोषेचे बळी ठरलेले असतात. मुलांवरील वाईट नजर काढून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या
ज्यावेळी एखाद्या मुलांला चांगले यश मिळते किंवा त्यांची बऱ्याचदा प्रशंसा होते अशा वेळी त्यांना वाईट नजर लागू शकते. यामुळे मुलाला अचानक थकवा जाणवणे अशा समस्या येऊ शकतात. अभ्यासात त्याचे मन हरवून जाते आणि अभ्यास करण्याऐवजी तो मोबाईल, गेम किंवा टीव्हीकडे ते आकर्षित होतात. जर ही स्थिती अशीच राहिली तर मूल वाईट नजरेच्या प्रभावाखाली राहतात.
जर एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या मुलांवर वाईट नजरेचा प्रभाव पडला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास त्या व्यक्तीला तुमच्या घरी खायला बोलवा. त्यानंतर तुमच्या मुलाला आशीर्वाद द्यायला सांगा. हा खूप प्रभावी उपाय मानला जातो.
एखाद्या गरजू मुलाला नोटबुक, पुस्तके, पेन आणि पेन्सिल इत्यादी साहित्याचे वाटप करा. तुम्ही सक्षम असल्यास गरीब मुलांची फी भरा. असे केल्याने मुलांवरील वाईट नजर दूर होते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यास घाबरुन जाऊ नका. अशा वेळी घरामध्ये कोणतीही घाण ठेवू नका. तर ईशान्य दिशेला गणपती बाप्पा आणि देवी सरस्वतीची मूर्ती ठेवा. याची तुमच्या मुलांना दररोज पूजा करायला सांगा. यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील.
जर तुम्हाला मुलगा असल्यास त्याला हनुमान मंदिरात घेऊन जा आणि त्या ठिकाणी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते.
मोहरी आणि मीठ घेऊन ते मुलांच्या डोक्यापासून ते पायांपर्यंत सात वेळा फिरवा त्यानंतर ते गॅसवर तवा गरम करुन त्यावर टाका. वाईट नजर दूर करण्यासाठी हा एक खूप प्रभावी असा मार्ग आहे.
तुम्हाला वारंवार असे वाटत असल्यास तुम्ही जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे कोणाला दुखावले आहे त्यामुळे रागाच्या भरात तुमच्यावर वाईट नजर टाकली असल्यास त्याची माफी मागावी. कोणावरही राग बाळगू नका आणि सर्वांशी चांगले वागावे.
यावेळी मुलांना पौष्टिक आहार द्या. मुलांसमोर कधीही नकारात्मक गोष्टी बोलू नका. जर तुम्ही टीव्ही पाहत असल्यास त्यावर चांगले आणि माहितीपूर्ण कार्यक्रम लावा. त्यांना चांगली पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)