फोटो सौजन्य- pinterest
आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. श्रावण महिन्याची समाप्ती शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी होत आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस शुभ राहील. आज शेवटच्या सोमवारी जवची मूठ वाहिली जाते. आपल्या आयुष्यात महादेवाची कृपा व्हावी व जीवनात सदैव भरभराट समृद्धी यावी यासाठी श्रावणातील सोमवारी शिवमूठ वाहण्याची पद्धत आहे. यावेळी चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करावे. हे वाहिल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांची आपल्या भक्तांवर कृपा राहते, अशी मान्यता आहे. श्रावणातील शेवटच्या सोमवारी शिवमूठ अर्पण करुन कोणते उपाय करावे, जाणून घ्या
जर तुम्हाला अनेक प्रयत्न करून देखील कुटुंबातील सदस्यांना अपेक्षित यश मिळत नसेल, तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिव मंदिरात जा आणि भगवान शिव यांना लाकडी सफरचंद अर्पण करा. त्यासोबतच शिव चालिसाचे पठण करावे. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
जर तुम्हाला संपत्तीमध्ये वाढ करायची असेल, तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी स्नान केल्यानंतर एक नारळ घ्या आणि तो तुमच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवा आणि महादेवांची पूजा करा. हा नारळ देव्हाऱ्यामध्येच ठेवून द्या. असे केल्याने धनसंपत्तीत वाढ होण्यास मदत होईल.
जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात वाढ करायची असल्यास श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी मंदिरात 11 कवड्या ठेवा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर ते लाल कपड्यामध्ये बांधून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा किंवा तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. व्यवसायात वाढ करण्यासाठी ही एक धार्मिक श्रद्धा आहे.
जर तुम्हाला समाजात तुमचा दर्जा स्थापित करायचा असल्यास किंवा लोकप्रियता मिळवायची असल्यास शेवटच्या श्रावणी सोमवारी धतुरा आणि बेलपत्र अर्पण करा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करा. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हा उपाय केल्याने समाजामध्ये तुमचा आदर वाढू शकतो.
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद हवे असल्यास श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संध्याकाळी घरातील एका निर्जन ठिकाणी चटई पसरून बसा आणि महादेवांच्या मंत्रांचा 11 वेळा जप करावा. ‘ओम शिवाय नमः ओम’ या मंत्रांचा 11 वेळा जप करुन महादेवांचे आशीर्वाद मिळतील. यामुळे महादेव प्रसन्न होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)