Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: कुंडलीत सूर्य कमकुवत असल्यास मिळतात ‘ही’ संकेत, बळकट करण्यासाठी लगेच करा उपाय

ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान असतो त्याला आदर मिळतो पण एखाद्याच्या कुंडलीत कमकुवत असेल तर त्याला समस्यांना तोंड द्यावे लागते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 10, 2025 | 11:46 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला नऊ ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील घर आणि स्थानानुसार त्याच्या जीवनावर परिणाम करतो. मान्यतेनुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान असतो त्या व्यक्तीला समाजात कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळते. मात्र तो कमकुवत असल्यास त्याचे उलट परिणाम सहज दिसून येतात. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असल्यास त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येऊ शकतात. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत स्थितीत असल्यास कोणती लक्षणे जाणवतात, जाणून घ्या

कधी होतो सूर्य कमकुवत

ज्योतिषशास्त्राच्या मते, ज्यावेळी सूर्य तूळ राशीमध्ये कमकुवत असतो किंवा एखाद्या अशुभ ग्रहाच्या युतीत असतो तेव्हा तो कुंडलीत कमकुवत मानला जातो. ज्यावेळी सूर्य सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात असतो त्यावेळी त्याची स्थिती कमकुवत होते. ज्यावेळी सूर्य कमकुवत स्थितीत असतो त्यावेळी त्या व्यक्तीमधील आत्मविश्वास, स्वाभिमान आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.

ही लक्षणे दिसू शकतात

आत्मविश्वासाचा अभाव

जेव्हा सूर्य कमकुवत असतो तेव्हा व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि त्याला प्रत्येक काम करण्यास भीती वाटते.

निर्णय घेण्यात येऊ शकतात अडचण

ज्यावेळी कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असतो त्यावेळी व्यक्तीला निर्णय घेण्यात खूप अडचणी येतात.

Panchak 2025: पंचकाची सुरुवात कधीपासून होणार? पुढील 5 दिवस या गोष्टींपासून राहा दूर

आरोग्याच्या समस्या

कमकुवत सूर्यामुळे डोकेदुखी, हृदयरोग, डोळ्यांचे आजार आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

करिअरमध्ये अडथळे येणे

ज्यावेळी सूर्य कमकुवत असतो त्यावेळी यश मिळणे कठीण होते आणि नोकरी किंवा व्यवसायात समस्या येतात.

वडिलांशी मतभेद

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असलेल्या व्यक्तीचे वडिलांशी संबंध बिघडू शकतात आणि त्याला वडिलांकडून पाठिंबा मिळत नाही.

आदराचा अभाव

ज्यावेळी सूर्य कमकुवत असतो तेव्हा त्या व्यक्तीला समाजात आदर मिळत नाही आणि अनेकदा अशा लोकांना अपमानाचा सामना करावा लागतो.

Chandra Gochar: चंद्राचा शनिच्या कुंभ राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार अधिक फायदा

मानसिक समस्या

ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असते त्या लोकांना नकारात्मक विचार, राग आणि मत्सर यासारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात.

शारीरिक समस्या

ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असते त्या लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यासोबत
त्वचा आणि केसांच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

अपघातांचा धोका संभवणे

जर कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर अपघातांचा धोका होण्याची शक्यता जास्त असते.

कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असल्यास काय करावे

कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती मजबूत होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे. यासाठी दररोज सूर्याला पाणी अर्पण करावे, सूर्यनमस्कार करणे, गायत्री मंत्राचा जप करणे, सूर्यदेवाची पूजा करणे, गरिबांना दान करणे, वडिलांचा आदर करणे, रविवारी उपवास करणे, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि दान करणे. या गोष्टी कराव्यात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips if the position of the sun in the horoscope is weak take these measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
3

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
4

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.