फोटो सौजन्य- pinterest
तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे का? त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणी, समस्या, तणाव यांसारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे का? या सर्व गोष्टी घडत असल्यास तुम्ही हा एक उपाय नक्की करुन बघा. ज्योतिषशास्त्रा मते, कालसर्प दोष हा असा संयोग मानला आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष, विलंब आणि मानसिक दबाव वाढवू शकतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्याने गोमेद रत्न परिधान करणे खूप प्रभावी मानले जाते. काय आहे या रत्नामध्ये एवढे विशेष ज्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेला दोष दूर होतो, जाणून घ्या
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सर्व ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये येतात तेव्हा त्याला कालसर्प दोष म्हणतात. मात्र ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतूला छाया ग्रह देखील म्हटले जाते. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, निर्णयांवर आणि जीवनाच्या दिशेने होतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा दोष असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वारंवार अडथळे, अक्षमता, ताणतणाव, कौटुंबिक समस्या तसेच आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागते.
राहू ग्रहाचा संबंध गोमेद रत्नांशी संबंधित आहे. मान्यतेनुसार, रत्न राहूच्या वाईट प्रभावांना शांत करते आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि मानसिक स्थिरता आणते. राहू ग्रह एखाद्याच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असतो त्यावेळी कालसर्प दोष तयार होतो त्यावेळी गोमेद रत्न परिधान करणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळे कमी होतात आणि मानसिक शांती देखील मिळते.
कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. शक्यतो हे रत्न वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ या राशीच्या लोकांनी परिधान करणे शुभ मानले जाते. ज्यावेळी कुंडलीत राहू कमकुवत असल्यास किंवा या लोकांच्या जीवनामध्ये अज्ञात भीती, गोंधळ किंवा त्रास सतत उद्भवत असल्यास या लोकांनी गोमेद रत्न परिधान करणे शुभ मानले जाते.
गोमेद रत्न परिधान करण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. मात्र हे रत्न परिधान करण्यापूर्वी गंगाजल आणि दुधाने स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर ॐ राम राहवे नमः या राहूच्या मंत्रांचा जमत असल्यास 108 वेळा जप करावा मग हे रत्न परिधान करावे. मात्र हे रत्न चांदीच्या अंगठीत घालून बोटामध्ये परिधान केले जाते. गोमेद रत्नाची अंगठी उजव्या बोटाच्या मधल्या बोटावर घातली पाहिजे. ती परिधान करताना मन शांत राखणे आणि श्रद्धा बाळगणे महत्त्वाचे मानले जाते. पण हे रत्न परिधान करताना मांसाहारी पदार्थांपासून दूर राहावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)