
अंकाशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की, जानेवारीमध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्ये दैवी शक्तीचा विशेष प्रभाव असतो. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात जन्मलेले लोक वेगळ्या स्वभावाचे, ठाम विचारांचे आणि नेतृत्वगुणांनी युक्त मानले जातात. जानेवारी हा वर्षातील पहिला महिना असल्यामुळे या महिन्याचा मुख्य अंक 1 मानला जातो. अंक 1 हा सूर्याचा अंक असून तो तेज, आत्मविश्वास, अधिकार आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे.
अंकशास्त्रानुसार जानेवारीत जन्मलेले लोक जन्मतःच नेतृत्व करण्याची क्षमता घेऊन येतात. हे लोक जबाबदारी स्वीकारायला घाबरत नाहीत आणि कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात असते. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाणं आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं हा त्यांचा स्वभाव असतो.
या व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासी, मेहनती आणि शिस्तप्रिय असतात. कोणतंही काम अर्धवट सोडणं त्यांना आवडत नाही. ठरवलं तर ते पूर्ण करतातच. यामुळेच त्यांना आयुष्यात यश उशिरा का होईना, पण नक्कीच मिळतं आणि ते टिकाऊ असतं. अनेकदा हे लोक प्रशासन, व्यवसाय, व्यवस्थापन, राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात यशस्वी ठरतात.
जानेवारीत जन्मलेल्या व्यक्तीती अध्यात्मिक शक्ती दांडगी असते. यांना भविष्यातील घटनांबाबत संकेत मिळतात. यांना जन्मत: दैवीशक्ती मिळालेली असते. ही मंडळी चुकीच्या माणसांना आयुष्यात ठेवत नाही. योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता, संकट ओळखून वेळीच निर्णय घेणं, आणि लोकांचा स्वभाव पटकन समजून घेणं हे गुण त्यांच्यात दिसून येतात. यामुळेच काही लोक त्यांच्यात “दैवी शक्ती” असल्याचा विश्वास ठेवतात.
जानेवारीत जन्मलेल्या मंडळींच्या स्वभावात काही कमतरताही असू शकतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण तर काही वाईट गुण असतात . असंच जानेवारी महिन्यातील मंडळींमध्ये काही अवगुण देखील असतात. ही मंडळी कधी कधी त्यांच्या जवळच्या माणसांना हट्टी, कठोर आणि भावनांबाबत अलिप्त वाटू शकतात. स्वतःवर आणि इतरांवर जास्त अपेक्षा ठेवणं हेही त्यांचं एक वैशिष्ट्य आहे.एकूणच पाहिलं तर अंकशास्त्रानुसार जानेवारीत जन्मलेले लोक सूर्यासारखे तेजस्वी, ठाम, आत्मनिर्भर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे असतात. दैवी शक्तीपेक्षा त्यांच्या मेहनतीची, आत्मविश्वासाची आणि अंतःप्रेरणेचीच खरी ताकद त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.
Ans: जानेवारी हा वर्षातील पहिला महिना असल्यामुळे त्याचा मुख्य अंक 1 मानला जातो. अंक 1 हा सूर्याचा अंक असून तो तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे.
Ans: जानेवारीत जन्मलेल्या व्यक्तीती अध्यात्मिक शक्ती दांडगी असते. यांना भविष्यातील घटनांबाबत संकेत मिळतात.
Ans: हे लोक ठाम विचारांचे, आत्मविश्वासी, मेहनती आणि शिस्तप्रिय असतात. स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाणं आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणं हा त्यांचा स्वभाव असतो.