
फोटो सौजन्य- pinterest
घर बांधताना किंवा घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी, शुभ वेळ असावा का, या सर्व वास्तूसंबंधी गोष्टींची माहिती सांगण्यात आलेली आहे. प्रत्येकाला आपल्या घरात सकारात्मकता असावी, जीवनात कोणतेही दुःख नसावे आणि धनवृद्धी व्हावी असे वाटते. लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे अशात गेल्या वर्षात आलेले दुःख कुरवाळत बसू नका, कामाला लागा आणि नवीन वर्ष भरभराटीचे जावे यासाठी वास्तूचे हे उपाय करा.
घड्याळ बंद असेल तर लगेच ते सुरू करा. भिंतीवरील घड्याळ पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे याची काळजी घ्या. सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळ बघणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात असलेली आणि हातावरची घड्याळ बंद असतील तर ती लगेच सुरू करा.
आपल्या घरात आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात. परंतू, काळजी घ्या घरात असलेले कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये.
आपल्या घरी आपण जर रोपं लावली असतील आणि ती जगत नसतील तर अशी रोपं लगेच काढून टाका. तसेच, कोमेजून गेलेले आणि काटेरी झाड कुंडीत ठेवू नका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावी यामुळे घरातही सकारात्मकता येते.
कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशावेळी आपल्या कपाटात अनेक जुने, फाटलेले सर्व कपडे जमा होतात. हेच वास्तुदोषाचे कारण ठरते. त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरत नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा. लक्षात ठेवा देण्यासारखे कपडे असतील तर ते गरजूंना द्या.
पाण्यात मुक्तपणे विहारकरणारे मासे, सूर्योदय, मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत फोटो, मेढ्यांच्या कळपाचा फोटो अशी मनाला प्रसन्न करणारी आणि चेहऱ्यावर हसू आणणारी फोटो लावावी.
घरात कोणत्याही टुटलेल्या- फुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच फेकून द्या. कोणतीही टुटलेली काच असेल तर तीही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा, यामुळे घरातील नकारात्मकताही यासोबत बाहेर पडेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जुने व न वापरलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा साठवते. नवीन वर्षापूर्वी घर स्वच्छ केल्याने सकारात्मक ऊर्जा, सुख-शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो.
Ans: नाही. बंद घड्याळे प्रगती थांबवतात असे मानले जाते. ती दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा.
Ans: उत्तर व ईशान्य दिशा स्वच्छ व मोकळी ठेवा. या दिशांत कचरा किंवा जड वस्तू ठेऊ नयेत.