फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. म्हणून, या धातूपासून बनवलेल्या अंगठ्या, साखळ्या इत्यादी परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. चंद्र हा मन, मानसिक स्थिती, भावना आणि कल्पनाशक्तीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. चांदीची अंगठी परिधान केल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते. दरम्यान, अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी परिधान करण्याचे काही महत्त्वाचे नियम शास्त्रांमध्ये देखील सांगितले आहेत. चांदीची अंगठी घालण्याचा योग्य दिवस, ती कोणी परिधान करावी आणि ती कोणी घालणे टाळावे. अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी परिधान करण्याचे फायदे जाणून घ्या
चांदीचा संबंध चंद्राशी असल्याचे मानले जाते. चांदीच्या अंगठ्या फक्त काही विशिष्ट दिवशीच घालाव्यात. तुम्ही त्या पौर्णिमेच्या दिवशी परिधान करु शकता. याशिवाय, सोमवार आणि शुक्रवारी चांदीच्या वस्तू परिधान करणे देखील शुभ मानले जाते कारण याचा संबंध चंद्राशी देखील संबंधित आहेत. अशा वेळी खास दिवशी चांदीची अंगठी परिधान केल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनात त्याचे शुभ परिणाम होताना दिसून येतात.
चांदीची अंगठी कोणत्या अंगठ्यात परिधान करणे योग्य आहे तुम्हाला माहीत आहे का? चांदीची अंगठी अंगठ्यामध्ये उजव्या अंगठ्यात परिधान करणे शुभ मानले जाते. जर उजव्या हातात परिधान करणे शक्य नसल्यास डाव्या हाताच्या बोटात परिधान करु शकता. जर तुम्ही तुमच्या हातात दुसरी कोणतीही अंगठी घातली नसल्यास अनामिका बोटावर परिधान केली जाते. शुक्र पर्वत हा तळहाताच्या अंगठ्याच्या बाजूला असतो. म्हणूनच अंगठ्यावर चांदीची अंगठी परिधान करणे शुभ मानले जाते.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूमुळे चंद्र प्रभावित असेल तर त्यांनी चांदीची अंगठी घालणे टाळावे. शिवाय, ज्यांना सर्दी आणि फ्लूचा त्रास आहे त्यांनी देखील चांदी घालणे टाळावे. कारण चांदीचा संबंध चंद्राशी असल्याने, जो जल तत्वाशी संबंधित आहे, त्यामुळे योग्य रत्न परिधान करण्यापूर्वी तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, अन्यथा तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
काही लोकांनी चांदीची अंगठी परिधान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की कर्क राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी नक्कीच परिधान करावी. ज्यांच्या कुंडलीच्या नवव्या घरात चंद्र आहे अशा लोकांनी ही अंगठी परिधान करावी त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येताना दिसून येतील.
चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. नियमांचे पालन करून ते परिधान केल्याने तुमच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते. अशा वेळी व्यक्तीच्या आनंदामध्ये वाढ होऊ शकते. त्यासोबतच आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होऊ शकते. चांदीचा संबंध चंद्राशी असल्यामुळे मानसिक शांती आणते आणि एकाग्रता सुधारते. चांदीची अंगठी परिधान केल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होते आणि जीवनात आनंद समृद्धी येते. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यास देखील ही अंगठी मदत करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार अंगठा इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता दर्शवते. चांदी ग्रहाशी संबंधित असल्याने मनशांती, भावनिक संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
Ans: सोमवार आणि शुक्रवारी चांदीची अंगठी परिधान करावी.
Ans: चांदी शरीरातील उष्णता संतुलित ठेवते, रक्ताभिसरण सुधारते आणि मन शांत ठेवण्यास मदत करते