फोटो सौजन्य- pinterest
भारतीय परंपरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे यातील काही श्रद्धा लग्नानंतरच्या जीवनाशी संबंधित आहेत. मान्यतेनुसार, अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद टिकून राहते. आजून एक समजूत अशी आहे की, लग्नानंतर मुलीने तिच्या माहेरुन लोणचे आणू नये. ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते पण यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. असे म्हटले जाते की, नातेसंबंध गोड ठेवावेत आणि ते आंबट होऊ देऊ नयेत अशी एक जुनी म्हण आहे आणि लोणच्याचा आंबटपणा याच श्रद्धेशी जोडलेला आहे. मुलींनी माहेरुन येताना लोणच का आणू नये, काय आहे यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे, जाणून घ्या
मान्यतेनुसार, लोणच्याचा स्वभाव आंबट असतो आणि सासरच्या घरी आंबट पदार्थ नेल्याने नातेसंबंधात कलह निर्माण होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, मुलीने लग्नानंतर तिच्या माहेरुन लोणंच आणल्यास वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. असे करणे अशुभ मानले जाते.
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, माहेरुन लोणचं आणल्याने मुलगी सासरी पूर्णपणे स्थायिक झालेली नाही आणि ती तिच्या माहेरच्यांना जास्त महत्त्व देते. त्यामुळे सासरच्या लोकांमध्ये असमानता किंवा पक्षपाताची भावना निर्माण होऊ शकते त्यामुळे अनवधानाने नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते.
लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचे मिलन नसते तर दोन कुटुंबांचे मिलन असते. परंपरेनुसार, नवीन वधूचे काम तिच्या सासरच्या घरात एकता राखण्याचे असते. असे म्हटले जाते की तिने माहेरुन लोणचे आणल्याने ही एकता तुटू शकते. त्यामुळे वडीलधारी लोकांच्या म्हणण्यानुसार, आदर आणि सुसंवाद राखण्यासाठी या परंपरेचे पालन करणे चांगले आहे.
लोणचे बनवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो आणि प्रवासादरम्यान तेल नेणे शुभ मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, तेलामुळे प्रवासामध्ये सकारात्मक परिणाम कमी होतात. म्हणूनच माहेरुन सासरी जाताना लोणचे वाहून घेऊन जाणे अशुभ मानले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास माहेरुन सासरी लोणचे आणणे हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. प्रत्येक घरामध्ये लोणचं बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि चवीसोबतच त्यात वापरले जाणारे घटकही वेगळे असतात. यामुळे कधीकधी संसर्ग किंवा बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)