फोटो सौजन्य- pinterest
आपण दररोज ओमचा जप केल्याने मनाला शांती मिळते, तणाव आणि चिंता दूर होतात. रक्तदाब नियंत्रित राहते. ओम या ध्वनीमध्ये उर्जेचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये ओमला शक्तिशाली ध्वनी मानला जातो. ॐ ला प्रणव मंत्र असेही म्हणतात. मान्यतेनुसार प्राचीन काळामध्ये ऋषी, ध्यान, साधना करतेवेळी ॐ या मंत्रांचा उच्चार करत असत. प्रत्येकजणामध्ये तणाव, चिंता मानसिक अशांतता दूर होण्यास मदत होते. ॐ या मंत्रांचा दररोज उच्चार केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात, जाणून घ्या
ओम हा शब्द तीन अक्षरांपासून बनलेला आहे. अ, उ, म. ‘अ’ आपल्या जागृत अवस्थेचे प्रतीक आहे म्हणजेच तो जाणीवपू्र्वक असतो. ‘उ’ ओम हा आपल्या स्वप्नातील अवस्थेचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा आपण झोपेत स्वप्न पाहतो. म’ आपल्या गाढ झोपेच्या, बेशुद्ध अवस्थेचे प्रतीक आहे. मान्यतेनुसार ओम हा आपल्या जीवनाच्या तिन्ही स्तरावरचे प्रतिनिधित्व करतो. ओमला हिंदू धर्माव्यतिरिक्त बौद्ध, जैन आणि शीख धर्मात देखील विशेष स्थान देण्यात आलेले आहे.
दररोज ओमचा जप केल्याने मन शांत राहते. तसेच चिंता, भीती आणि ताण कमी होण्यास मदत होते. ओमच्या आवाजामुळे मेंदूत असे कंपन तयार होते की मनाला आराम मिळतो.
लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांनी ओमचा जप करणे खूप फायदेशीर ठरते. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मन एकाग्र करण्यासाठी ओमचा जप करणे फायदेशीर ठरते.
ओमचा जप करताना दीर्घ श्वास घेऊन केला जातो यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. तसेच हृद्य निरोगी राहणे आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
दररोज ओमचा जप केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील अवयवामधील ऊर्जा वाढून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
दररोज मंत्रांचा जर केल्याने रक्ताभिसरण सुधारते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊन त्वचा निरोगी राहते.
तुम्हाला झोप येत नसल्यास किंवा तुम्ही वारंवार जागे राहत असल्यास तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी ओमचा जप करावा. ओमचा झोप केल्याने झोप येण्यास मदत होते आणि मन शांत राहते.
सकाळी आवरल्यानंतर शांत ठिकाणी बसून डोळे बंद करावे. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन हळूहळू ओमचा जप करावा. असे किमान 15 ते 20 वेळा करावे. त्यामुळे तुमचे मन आपोआप एकाग्र होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)