Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

लंकेचा राजा रावण हा एक अत्यंत विद्वान विद्वान होता. तो विश्रवा ऋषींचा मुलगा होता. रावणाला अनिती, व्याभिचार, गर्विष्ठता, काम, क्रोध, लोभ, अधर्माचे आणि वाईटाचे प्रतीक मानतात. रावणाचा जन्म कसा झाला, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 04, 2026 | 01:15 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रावणाचा जन्म कसा झाला
  • ब्राह्मणकुळात रावणाचा जन्म
  • ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला
 

हिंदू धर्मानुसार लंकापती रावणाला अनिती, व्याभिचार, गर्विष्ठता, काम, क्रोध, लोभ, अधर्माचे आणि वाईटाचे प्रतीक मानले जाते आणि त्याचा द्वेष केला जातो. रामायणातील रावण हा अत्यंत विद्वान, शिवभक्त आणि वेदांचा ज्ञाता म्हणून ओळखला जातो. तरीही इतिहासात त्याची ओळख “राक्षसराज”अशी आहे. ब्राह्मणकुळात जन्म घेऊनही त्याच्यात राक्षसी गुण कसे आले, रावणाच्या जन्मामागे काय रहस्य आहे, जाणून घ्या यामागील पौराणिक कथा.

रावणाचे वडील ऋषी विश्रवा हे महान तपस्वी ब्राह्मण होते. त्याची आई कैकसी ही राक्षसकुळातील होती. कैकसीचा पिता सुमाली हा बलाढ्य राक्षस होता. सुमालीला आपल्या वंशाची पुन्हा सत्ता प्रस्थापित करायची होती. म्हणून त्याने कैकसीला विश्रवा ऋषींशी विवाह करण्यास सांगितले, जेणेकरून संतती बलवान आणि तेजस्वी होईल.

यामुळे रावणाला वडिलांकडून ब्राह्मणत्व, ज्ञान आणि तपश्चर्या मिळाली; तर आईकडून राक्षसी स्वभाव, महत्वाकांक्षा आणि क्रूरता लाभली, असे वर्णन पुराणांत आढळते.

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

रावणाच्या जन्मामागील कथा काय आहे

पौराणिक कथेनुसार, भगवान श्री रामांच्या जीवनकाळात रावणाला विशेष महत्त्व आहे. रावण हा सोन्याच्या लंकेचा राजा होता. परंतु रावणाच्या जन्माशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, रावण पुलत्स्य मुनीचे पुत्र महर्षि विश्रवा आणि राक्षसी कैकसीचा मुलगा होता. पौराणिक काळात माली, सुमाली आणि मलेवण नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंड होती. या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले. हे वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भावांनी स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक येथील देवतांसहित ऋषी-मुनी आणि मानवांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पण जेव्हा या तिन्ही भावांचा अत्याचार मोठ्या प्रमामात वाढला तेव्हा ऋषी-मुनी आणि देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांच्याकडे माली, सुमाली आणि मलेवण यांनी तिन्ही भावांच्या अत्याचाराचे वर्णन केले.

Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

रावण क्रूर कसा बनला

पौराणिक कथेनुसार, कैकसीने अशुभ वेळी गर्भधारणा केली. त्या काळातील ग्रहस्थिती प्रतिकूल असल्याने संततीच्या स्वभावावर त्याचा परिणाम झाला, अशी मान्यता आहे. म्हणूनच रावण अत्यंत बुद्धिमान असूनही अहंकारी आणि क्रूर बनला, असे सांगितले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रावणाचे वडील आणि आई कोण होते?

    Ans: रावणाचे वडील ऋषी विश्रवा हे ब्राह्मण आणि महान तपस्वी होते, तर आई कैकसी ही राक्षसकुळातील होती.

  • Que: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावणाला राक्षस का म्हटले जाते?

    Ans: त्याच्या आईकडील राक्षसवंश, महत्त्वाकांक्षा आणि अहंकारामुळे त्याच्यात राक्षसी प्रवृत्ती वाढली, असे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे.

  • Que: रावणाचा जन्म कोणत्या उद्देशाने झाला, असे पुराणात म्हटले आहे?

    Ans: काही कथांनुसार देवांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी आणि धर्मस्थापनेसाठी रावणाचा जन्म झाला, असे वर्णन आहे.

Web Title: Ravana janm brahman kul rakshas pauranik katha marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Ramayana
  • Religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.