Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. यावेळी प्रदोष व्रत शनिवारी येत असल्याने त्याला शनि प्रदोष व्रत म्हटले जाणार आहे. शनि प्रदोष व्रत कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 04, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि प्रदोष व्रत कधी आहे
  • शनि प्रदोष व्रत मुहूर्त आणि पूजा पद्धत
  • शनि प्रदोष व्रताचे फायदे
 

वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत खूप खास असणार आहे. हिंदू धर्मामध्ये या व्रताला विशेष महत्त्व आहे. काही भक्त या दिवशी उपवास देखील करतात. असे केल्याने व्यक्तीला भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावर्षी प्रदोष व्रत शनिवारी येत असल्याने ते या वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत आहे. हे व्रत पाळल्याने महादेवांसोबतच शनि देवाचे देखील आशीर्वाद तुमच्यावर राहतील. शनि प्रदोष व्रत कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे शनि प्रदोष व्रत

पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.2 वाजता सुरू होणार आहे आणि त्रयोदशी तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.5 वाजता होईल. अशा वेळी प्रदोष व्रत 14 फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे. हे व्रत शनिवारी येत असल्याने त्याला शनि प्रदोष व्रत असे म्हटले जाणार आहे. या दिवशी पूजा केल्याने महादेवांसोबतच शनि देवाचे देखील आशीर्वाद तुमच्यावर राहू शकतो.

Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

शनि प्रदोष व्रत मुहूर्त

वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळची प्रार्थना करणे सर्वोत्तम मानले जाते. प्रदोष कालावधी संध्याकाळी 5.25 ते 6.55 पर्यंत असणार आहे. प्रदोष काळ सूर्यास्ताच्या सुमारे 45 मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे असतो. या काळात प्रदोष व्रत पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते.

शनि प्रदोष व्रत पूजा पद्धत

प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करून देव्हारा स्वच्छ करून घ्या

एका चौरंगावर वस्त्र पसरवून त्यावर भगवान शिव आणि देवी पार्वतीची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी

सर्वत्र गंगाजल शिंपडा आणि भगवान शिव यांना दही, दूध, गंगाजल, मध इत्यादींनी अभिषेक करा.

महादेवांना बेलाची पाने, फुले, चंदन, नैवेद्य, अगरबत्ती इत्यादी अर्पण करा. तसेच माता पार्वतीच्या शृंगाराच्या वस्तू देखील अर्पण करा.

शिव आणि देवी पार्वतीची पूजा विधीनुसार करा. या दिवशी गणपतीचीही पूजा करावी.

संध्याकाळच्या वेळी पांढरे कपडे परिधान करा आणि भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर, भगवान शिवला ताजी फुले, बेलपत्र आणि इतर नैवेद्य अर्पण करा.

महादेवांची पूजा झाल्यानंतर आरती करावी. त्यामुळे महादेव प्रसन्न होऊन त्यांचा भक्तांवर आशीर्वाद राहतो.

प्रदोष व्रत शनिवारी असल्याने या दिवशी शनिदेवाचीही पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि शनिस्तोत्र आणि चालिसाचे पठण करावे.

Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, ‘हे’ उपाय केल्याने तुमचे चमकेल नशीब

संध्याकाळी, भगवान शिवाचा मंत्र, “ॐ नमः शिवाय,” किंवा महामृत्युंजय जप करा. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

शनि प्रदोष व्रताचे फायदे

शनि प्रदोष व्रत पाळल्याने आत्मविश्वास वाढतो. जीवनातील अडथळे हळूहळू नाहीसे होतात, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मनाला स्थिरता मिळते. शनि प्रदोषाचे व्रत श्रद्धा आणि भक्तीने केल्याने जीवनाला सकारात्मक दिशा मिळते असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि प्रदोष व्रत कधी आहे

    Ans: शनि प्रदोष व्रत शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी आहे.

  • Que: शनि प्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा केल्यास पापक्षय, अडथळ्यांचे निवारण आणि मनःशांती मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: शनि प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते दान करणे शुभ आहे

    Ans: शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काळे तीळ, काळे वस्त्र, अन्नदान आणि गरजूंना मदत करणे शुभ मानले जाते.

Web Title: Shani pradosh vrat 2026 first of the year vrat shubh muhurt worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
1

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
2

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
3

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.