फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, काही वनस्पतींमध्ये देवतांचा वास असतो, असे मानले जाते. त्यामुळे त्या वनस्पतीची पूजा करण्याची तरतूद आहे. विशेष सण उत्सवांच्या वेळी शमी, केळी, वड, कडुनिंब, पिंपळ, आवळा, बेल इत्यादी वनस्पतींची पूजा करण्याची प्रथा आहे. यापैंकीच दोन वनस्पतीची पूजा केल्याने फायदे होऊ शकतात पण या वनस्पती कधीही घरात ठेवू नये नाहीतर नुकसान होऊ शकते. तसेच काही लोकांना आर्थिक संकटांचा देखील सामना करावा लागू शकतो.
गुरुवारच्या दिवशी केळी आणि शनिवारच्या दिवशी शमीच्या रोपाची पूजा केली जाते. पण ही रोपे चुकूनसुद्धा आपल्या घरामध्ये लावू नये. चुकूनही ही रोपे घरात लावल्यास त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम जाणवतो.
केळीचे रोप हे गुरु देवाचे निवासस्थान मानले जाते. मात्र ही रोपे घरामध्ये लावल्याने गुरु ग्रहाची ऊर्जा असंतुलित करू शकते. असंतुलित गुरु ग्रहामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जसे की विवाह, मुले आणि संपत्तीमध्ये अडथळा निर्माण होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तसेच केळीच्या रोपाला पाण्याचे तत्व मानले जाते. जर केळीचे रोप पश्चिम किंवा आग्नेय दिशेला लावल्यास कुटुंबामध्ये वाद होणे, कामामध्ये अडथळा येणे परिवारातील सदस्यांमध्ये तणावा परिस्थिती उद्भवणे यांसारख्या समस्या येऊ शकतात.
असे देखील मानले जाते की, केळीच्या झाडामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. ती आपल्या जीवनात प्रवेश करु शकते. केळीचे झाड घराच्या आतमध्ये, मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीच्या आजूबाजूला लावले असल्यास त्यातील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. या सगळ्यांचे नकारात्मक परिणाम परिवारातील सदस्यांवर होताना दिसून येतात.
त्याचप्रमाणे केळीचे रोप घराच्याबाहेर किंवा मंदिराच्या आसपास लावावे. हे रोप तुम्ही बागेच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यामध्ये लावू शकता.
शनिदेवाचे आवडते वृक्ष शमी आहे. असे मानले जाते की, शमीचे रोप घरात लावल्यास शनिदेव देखील तुमच्या घरात प्रवेश करतो. त्यामुळे तुमच्या जीवनात अशांतता निर्माण होऊ शकते.
हे रोप तुम्ही घरामध्ये ईशान्य किंवा आग्नेय दिशेला लावल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. तुमच्यावर नकारात्मक उर्जेचा प्रभाव पडू शकतो. यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. घरामध्ये वाद होऊ शकतात, तणाव निर्माण होऊ शकतो.
शमीचे रोप हे एक काटेरी झाड आहे. हे तुम्ही घरामध्ये लावल्यास तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते.
शमीचे रोप घरामध्ये लावण्याऐवजी कोणत्याही शनि मंदिरात लावा. शनिवारी मंदिरात शमीचे रोप लावून त्याची पू़जा करणे शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)