फोटो सौजन्य- pinterest
कोणत्याही कार्यालयात किंवा व्यवसायात चांगल्या कल्पना, योजना आखणे किंवा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे नसते तर त्यामागील मुख्य कारण म्हणजे एक मजबूत आणि विश्वासार्ह टीम असणे गरजेचे असते. जर कर्मचारी व्यवस्थित काम करत नसतील, वारंवार कंपनी सोडून जात असतील तुम्हाला पाठिंबा देणारे लोक विश्वासार्ह नसतील यांसारख्या गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यवसायाची वाढ किंवा कामाच्या ठिकाणी होऊ शकतो. या समस्येचे मु्ख्य कारण काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्यास काय करावे.
वास्तुशास्त्रामध्ये कार्यालय किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वास्तूच्या प्रत्येक दिशेला वेगळे महत्त्व दिलेले आहे. तसेच कर्मचारी आणि सहाय्यक यंत्रणेशी संबंधित दिशा म्हणजे वायव्य दिशा. जर वायव्य दिशेचा योग्य वापर केला गेला असल्यास तुमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची स्थिरता वाढण्यास मदत होते. सहयोगी वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे व्यवसायामधील उत्पादकता वाढण्यास मदत होईल किंवा कामाच्या ठिकाणी देखील अनेक फायदे होतील.
वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचा संबंध तुमच्या सपोर्ट सिस्टीमशी संबंधित असल्याचे मानले जाते. सपोर्ट सिस्टीम ही केवळ कर्मचाऱ्यांची संबंधित नसून तुमच्यासोबत काम करणाऱ्या सर्व लोकांसोबत समाविष्ट असलेली दिशा होय. जर या दिशेला वास्तूदोष असल्यास कर्मचारी वारंवार कंपनी सोडून जात असल्याची समस्या जाणवू शकते, तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही किंवा एखाद्या वेळेस तुमच्या विरोधात देखील उभे राहू शकतात.
ज्या कार्यालयामध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये शौचालय, कॅटिंन अशा काही गोष्टी असल्यास या सर्व गोष्टींमूळे तुमच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेल्या समस्येमध्ये वाढ होऊ शकते. बहुतेक वेळा असे घडते की, खराब झालेल्या किंवा तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा फाईल्स या फेकून न देता तिथेच ठेवल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणावरील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या मनावर आणि काम करण्याच्या वृत्तींवर होताना दिसून येतो.
जर कार्यालयाचा वायव्य कोपरा चुकीच्या दिशेने बांधला असल्यास समतोल राखणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे खालील पद्धतीने काही उपाय करता येतील.
वायव्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. तसेच त्या ठिकाणी कोणतेही खराब झालेले सामान ठेवू नये.
शक्यतो त्या कोपऱ्यामध्ये पांढरा प्रकाश किंवा परावर्तक ठेवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तिथली ऊर्जा कायम सक्रिय राहण्यास मदत होईल.
त्याचप्रमाणे त्या दिशेला पांढरा किंवा हलका राखाडी रंगांचा वापर करा.
जर तुमचा वायव्य कोपरा संतुलित असेल तर कार्यालयामध्ये काम करणारे लोक अधिक जबाबदारीने काम करतील. तसेच वारंवार कर्मचारी बदलण्याची वेळ येणार नाही. दिशेची योग्य काळजी घेतल्यास व्यवसायात वाढ होण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला कामामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)