फोटो सौजन्य- pinterest
रस्त्यावर चालताना आपल्याला विविध वस्तू पडलेल्या दिसतात. अशा वेळी या वस्तू ओलांडून जाणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार रस्त्यावर पडलेल्या काही वस्तू कधीही ओलांडण्याची चूक करु नये. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच त्याचे जीवन समस्यांनी भरलेले असते. रस्त्यावर पडलेल्या कोणत्या गोष्टी ओलांडू नये, जाणून घ्या
रस्त्यामध्ये लिंबू मिरची पडलेली असल्यास ते ओलांडून जाऊ नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जर जाणूनबुजून किंवा नकळत रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरची ओलांडली गेली तर जीवनातील नकारात्मकता दूर होते. याचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. तसेच काही लोकांना मानसिक ताणतणावाचा देखील सामना करावा लागू शकतो.
मान्यतेनुसार, काही लोक त्यांच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला काही उपाय केले जातात. अशा वेळी तुम्हाला रस्त्यामध्ये अगरबत्ती किंवा धूपबत्तीची राख आणि पूजा साहित्य रस्त्यावर पडलेले दिसल्यास ते कधीही ओलांडण्याची चूक करु नका. असे केल्यास तुम्हाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो. तसेच अनेक समस्येला तोंड द्यावे लागते.
काही वेळेस रस्त्यामध्ये पैसे किंवा रुपया पडलेले आढळते हे ओलांडून जाणे चुकीचे मानले जाते. या गोष्टी देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याने त्यांचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रस्त्यावर पडलेले पैसे ओलांडून गेल्यास गरिबी येऊ शकते.
रस्त्यावर किंवा चौकाचौकात हळद, सिंदूर किंवा तांदूळ यासारख्या वस्तू ओलांडणे निषिद्ध मानले जाते. मान्यतेनुसार या गोष्टी तांत्रिक विधींचा भाग असतात जे विधी रात्री केले जातात. या गोष्टी ओलांडल्यास त्याच्या अशुभ परिणांमामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
रस्त्यावरुन जाताना तुम्हाला नारळाचे तुकडे पडलेले दिसले किंवा पूजेच्या सामानासकट नारळ पडलेला असणे तर ते ओलांडून न जाता ते लांब नेवून ठेवावे. शास्त्रात म्हटल्यानुसार रस्त्यावर ठेवलेल्या या वस्तूचा वापर तांत्रिक गोष्टींसाठी केला जातो असे मानले जाते. तुम्ही हा नारळ चुकून ओलांडला असल्यास जीवनामध्ये नकारात्मकता प्रवेश करु शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)