चुकूनही या 5 वस्तू उधारीवर घेऊ नका ; नाहीतर होतील गंभीर परिणाम
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला मोठं महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे बऱ्याच घरात वास्तूशास्त्रानुसार सजावट केल्या जातात. काही वेळा पुरेसे पैसे नसल्याने सामान उधार आणलं जातं. मात्र वास्तूशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या उधारीवर आणल्याने घरात वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. अशा कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घ्या.
बऱ्यादचा वाण सामान किंवा इतर जीवनावश्यक वस्तू काही काराणाने उधारीवर आणल्या जातात मात्र हे तुमच्या घरातील वास्तूदोषाचं कारण ठरु शकतं. असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
मीठ हे जीवनावश्यक घटकांमध्ये येतं. लहानपणापासून मीठासंबंधित अनेक रंजक दंतकथा ऐकण्यात आलेल्या असतात. ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की, मीठ कधीही उधार घेऊ नये. जर मीठ उधार घेतलं तर व्यक्ती कर्जबाजारी होते, तसंच गृहक्लेश वाढतात असं सांगितलं जातं. असं म्हणतात की, मीठ हे शनीदेवांच्या अधिपत्याखाली येतं. त्यामुळे मीठ उधार घेतल्याने शनीदेवांचा कोप होतो असं म्हटलं जातं. म्हणूनच मीठ कधीही पैसे देऊनच खरेदी करावं असं सांगितलं जातं.
दिवाळीत लक्ष्मीपुजनाला केरसुणीची देखील पुजा केली जाते. केरसुणी ही घरात कचरा म्हणजे नकारात्मकता बाहेर टाकते. त्यामुळे तिला लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. कुबेराप्रमाणेच माता लक्ष्मी ही धन-संपत्तीची देवता मानली जाते. त्यामुळे केरसुणी कधीच उधारीवर आणू नये. असं केल्याने अनाठायी खर्च वाढण्यास सुरुवात होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.
हेही वाचा-घरात लक्ष्मी सोबत ठेवा या देवतेची मूर्ती
ज्योतिषशास्त्रानुसार रुमाल हा नातेसंबंधांचं प्रतिनिधीत्व करतो. असं म्हणतात की, जवळच्या व्यक्तीकडून कोणत्या नातेवाईकांकडून रुमाल उधारीवर घेऊ नये. असं केल्याने नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.
घड्याळ वेळ दाखवते. प्रत्येकजण आपली चांगली वेळ यावी याकरीता धडपडत असतो. मात्र मेहनत करण्याबरोबर ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगितले आहेत. असं म्हणतात की, घड्याळ उधारीवर घेऊ नये,. असं केल्यास करियरमध्ये आणि नातेसंबंधात देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे चुकूनही उधारीवर घड्याळ घेऊ नये.
हेही वाचा-तुमचा मूलांक काय? सांगेल एखाद्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व – Navarashtra
ज्योतिष शास्त्रानुसार सौभाग्याचं वाण कधीही उधारीवर घेऊ नये. असं केल्याने पती पत्नीच्या नात्यात तेढ निर्माण होते. म्हणूनच सौभाग्याचं वाण कधीही उधारीवर घेऊ नये असं म्हणतात.