Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Shastra : पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट, कसं ते, जाणून घ्या सविस्तर

भारतीय संस्कृतीत तांब्याला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्र असो धार्मिक कोणतीही कारणं असो देवाच्या पूजेसाठी देखील पितळ आणि तांब्याची भांडी वापरली जातात. हेचं तांबं वास्तूदोष देखील दूर करतं कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 02:52 PM
Vastu Shastra : पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट, कसं ते, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:
  • पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट,
  • कसं ते, जाणून घ्या सविस्तर
भारतीय संस्कृतीत तांब्याला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्र असो धार्मिक कोणतीही कारणं असो देवाच्या पूजेसाठी देखील पितळ आणि तांब्याची भांडी वापरली जातात. असं मानलं जातं की, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्य़ाने सगळं शुभ होतं. योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवलेल्या तांब्याच्या पाण्याने भरलेलं भांडं घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करतं, असं वास्तूशास्त्र सांगतं.

तांब्याच्या भांड्याचं महत्त्व काय?

वास्तुशास्त्रानुसार, तांबं हे सूर्य आणि अग्नी तत्त्वाचा धातू आहे. सूर्य ऊर्जा, तेज आणि सकारात्मकता यांचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे तांब्याचं भांडं घरात ठेवल्यास वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. हे अध्यात्मिक कारण आहे.

कुठे ठेवावं तांब्याचं पाणी?

घराच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवावं. तुम्ही मुख्य दरवाजाजवळ लहान तांब्याचं भांडं देखील ठेवू शकता.
देवघरात तांब्याच्या कलशात पाणी ठेवणं अधिक लाभदायक देखील ठरतं.

कसा होतो वास्तूदोषाचा नायनाट?

वास्तुशास्त्रानुसार पाणी हे चंद्र आणि शांततेचं प्रतीक आहे, तर तांबे सूर्यतत्त्वाचं. या दोन तत्त्वांचा संतुलित मिलाफ घरातील उर्जेचा समतोल राखतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो, कुटुंबात सौहार्द वाढतं आणि आर्थिक स्थैर्याला चालना मिळते, अशी श्रद्धा आहे.

काय काळजी घ्यावी ?

तांब्याचं भांडं रोज स्वच्छ धुवून त्यात ताजं पाणी भरावं.

पाणी जुने किंवा दूषित होऊ देऊ नये.

आठवड्यातून एकदा भांडं लिंबू किंवा चिंचेने स्वच्छ करावं.

वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या साध्या उपायाने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, असा समज आहे. श्रद्धा आणि नियमितता यांची जोड दिल्यास तांब्याच्या पाण्याचा उपाय अधिक परिणामकारक ठरू शकतो.हा उपाय करताना श्रद्धा आणि सातत्य महत्त्वाचं आहे. वास्तुदोष पूर्णपणे दूर होतो की नाही याबाबत वैज्ञानिक पुरावे मर्यादित असले तरी, सकारात्मक विचार आणि स्वच्छतेची सवय यामुळे घरातील वातावरण नक्कीच प्रसन्न राहू शकतं. अध्यात्माबरोबरच याला शास्त्रीय कारणांची देखील जोड आहे.

तांब्याचे जंतुनाशक गुणधर्म
तांबे (Copper) हा नैसर्गिकरित्या अँटीमायक्रोबियल धातू आहे. संशोधनानुसार, तांब्याच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू जास्त काळ टिकत नाहीत. या प्रक्रियेला “ओलिगोडायनॅमिक इफेक्ट” असं म्हटलं जातं. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी काही प्रमाणात नैसर्गिकरित्या शुद्ध राहण्यास मदत होते.

तांब्याच्या भांड्यात काही तास पाणी ठेवल्यास त्यात सूक्ष्म प्रमाणात तांब्याचे आयन मिसळतात. हे आयन शरीरासाठी सूक्ष्म मात्रेत उपयुक्त मानले जातात. तांबे हे शरीरातील  हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी देखील फायदेशीर आहे.

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

धातूंचे आरोग्यदायी परिणाम

घरातील हवेची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच याचे शरीरासाठी देखील पोषक घटक आढळतात. World Health Organization (WHO) नुसार तांब्यामध्ये शरीराला आणि घरातील हवा शुद्ध ठेवण्यास आवश्यक असे सूक्ष्म खनिज घटक आहेत. योग्य प्रमाणात तांब्याचं सेवन शरीराच्या वाढी, मेंदूच्या कार्य आणि हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असतं. मात्र अति प्रमाण टाळणं गरजेचं आहे.

स्वच्छता आणि सवय

तांब्याचं भांडं रोज धुणं, ताजं पाणी भरणं या सवयींमुळे घरात स्वच्छता राखली जाते. स्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग कमी होतो आणि घरातील वातावरण आरोग्यदायी राहतं. यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मकता वाढते.

मानसिक परिणाम

जेव्हा आपण एखादा उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे करतो, तेव्हा मनात सकारात्मक भावना निर्माण होतात. सकारात्मक विचारांचा परिणाम मानसिक आरोग्यावर चांगला होतो, हे मानसशास्त्रही मान्य करतं.म्हणूनच तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्यामागे फक्त धार्मिक श्रद्धाच नाही, तर काही प्रमाणात वैज्ञानिक आधारही आहे. मात्र कोणताही उपाय करताना संतुलन आणि जागरूकता आवश्यक आहे.

Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

Web Title: Vastu tips vastu tips a copper vessel filled with water will eliminate vastu defects how to do it know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Vastu Shastra
  • Vastu Tips For Morning

संबंधित बातम्या

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम
1

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
2

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम
3

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.