फोटो सौजन्य- pinterest
ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण आणि व्रत साजरे केले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला होते. यावेळी चित्रा नक्षत्रामध्ये श्रावण शुक्ल अष्टमीला ज्येष्ठा नक्षत्राच्या संयोजनाने महिना संपेल. व्रत आणि सणांच्या दृष्टीने ऑगस्ट महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी असे महत्त्वाचे सण येतात. तर पुत्रदा एकादशी, अजा एकादशी आणि प्रदोष व्रत देखील ऑगस्ट महिन्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात येणारे सण आणि व्रत कोणते आहेत ते जाणून घ्या
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत अपत्यप्राप्तीसाठी केले जाते. यंदा हे व्रत मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी आहे आणि त्या दिवशी मंगळागौरीचे व्रत देखील केले जाणार आहे.
महादेवांना समर्पित असलेले प्रदोष व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजे बुधवार, 6 ऑगस्ट रोजी आहे. हे व्रत बुधवारी येत असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत असे म्हटले जाते.
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.
गणेश चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हे व्रत करणाऱ्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.
कृष्ण जन्माष्टमीचा सण शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी आहे. तर 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी केली जाणार आहे.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अजा एकादशी साजरी केली जाते. यावेळी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.
ऑगस्ट महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत 20 ऑगस्ट रोजी आहे. यावेळी शिव पार्वतीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी बुधवार असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाते.
दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस भगवान शिवाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. हे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात हरतालिका व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत सर्वात कठीण व्रतांपैकी एक आहे. यावेळी हरतालिकेचे व्रत मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यावेळी गणेश चतुर्थी बुधवार, 27 ऑगस्ट रोजी आहे.
सनातन धर्मात, ऋषीपंचमीचा सण सप्त ऋषींच्या पूजेसाठी समर्पित आहे. यावेळी ऋषी पंचमी गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)