फोटो सौजन्य- pinterest
सोमवार, 15 सप्टेंबरचा दिवस विशेष राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र असेल. चंद्र दिवसरात्र मिथुन राशीत गुरूसोबत संक्रमण करेल त्यामुळे गजकेसरी शुभ योग तयार होईल. त्यासोबतच बुध ग्रहाने कन्या राशीमध्ये राहणार आहे. त्यामुळे आज भद्रराज योग तयार होईल. त्यासोबतच आर्द्रा नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होईल. भद्रराज योगामुळे मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. भद्रराजयोग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना आर्थिक बाबतीत खूप फायदा होईल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. मात्र कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम करु शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही केलेल्या योजनेचा तुम्हाला फायदा होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. करिअर आणि कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. नोकरीमध्ये तुम्हाला सकारात्मक फायदा मिळू शकतो. सहकारी आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. आर्थिक बाबतीत तुमचा दिवस आनंददायी जाईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून मदत आणि पाठिंबा मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर असणार आहे. वकिलीच्या कामात सहभागी असलेल्या लोकांना मोठी संधी मिळू शकते. नोकरीत बुद्धिमत्ता आणि हुशारीचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही या काळात एका नवीन प्रकल्पाची सुरुवात करु शकता. तुम्हाला सरकारी क्षेत्रातील कामात यश मिळेल. त्यासोबतच अल्पकालीन गुंतवणूक आणि व्यवस्थापनातूनही फायदा होईल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल. तसेच तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. एक धाडसी निर्णय तुम्हाला यशस्वी करेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत तुमच्या सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक भागीदारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमचे कोणतेही अपूर्ण काम वेळेवर पूर्ण होतील. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी संपत्तीत वाढ आणणार आहे. आर्थिक योजनेत गुंतवणूक करून पैसे कमवू शकता. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात भाग घेऊन तुम्हाला आदर मिळेल. धार्मिक कार्यात तु्म्हाला आवड निर्माण होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)