फोटो सौजन्य- pinterest
आजचा सोमवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आज 6 अंक असलेल्यांचा स्वामी ग्रह शुक्र असेल. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव पडेल. आजच्या सोमवारचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल आणि नातेवाईक भेटू शकतात. तसेच मूलांक 6 असलेले लोक नवीन कामाची सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नवीन कामाची सुरुवात कराल. अशा वेळी तुम्हाला तुमच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करायला हवे. वरिष्ठांशी बोलताना विचार करा. रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी खुप मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. त्यामुळे तुमच्यावरील तणाव कमी होईल. तुमचे बॅकेसंबंधित काही काम अडकले असतील तर ते पूर्ण होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
मूलांक 4 असणार्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही बाबतीत तुम्हाला सावध रहायला पाहिजे. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी बोलताना विचारपूर्वक बोला. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला असू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आधीपासून कोणत्याही समस्येचा सामना करत असाल तर सावध रहा. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेताना तुम्हाला विचारपूर्वक घ्यावा लागेल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस प्रतिकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पाची योजना आखू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कौटुंबिक वातावरण शांत राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांना अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरीच्या स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव निराशा येऊ शकते. संयम आणि कठोर परिश्रम भविष्यात नक्कीच यश मिळवून देतील. मालमत्तेशी संबंधित कामात जास्त व्यस्त राहाल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. कोणत्याही बाबतीत हट्टी राहण्याचे टाळा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला जास्त राग टाळावा लागेल. तुम्ही स्वतः जितके शांत राहाल तितके चांगले होईल. नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)