फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात आजपासून होत आहे. या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. या आठवड्यामध्ये पितृपक्षामधील शेवटचा आठवडा आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अविधवा नवमी आहे आणि शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या कामात नवीन ऊर्जा आणि उत्साहाने तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु काही राशींना अनावश्यक वाद आणि गुंतागुंत टाळावे लागेल. या काळात आर्थिक, आरोग्य आणि नातेसंबंध यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यामध्ये तुम्ही कोणत्याही कामात घाई करणे किंवा रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. मुलांशी संबंधित समस्या तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनतील. व्यवसाय आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राहील. आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणतीही गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यामध्ये समस्या येऊ शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित असेल. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये जास्त वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा चांगला राहील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चढ उतारांनी भरलेला राहील. अचानक खर्चामध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य असू शकतो. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमच्या समस्या दूर होतील. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित कामे इच्छेनुसार पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा स्पर्धेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद दूर होतील.
Pitru Paksha: पितृपक्षामधील नवमी कधी आहे? या दिवशी कोणाचे केले जाते श्राद्ध
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उताराचा राहील. कामाच्या ठिकाणी अचानक बदल होऊ शकतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहील. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. करिअर आणि व्यवसायामध्ये अनुकूलता जाणवू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. उच्च शिक्षणातील अडथळे दूर होऊ शकतात. कौटुंबिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांचा राहील. या आठवड्यात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा प्रतिकूल राहील. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. दीर्घकालीन गुंतवणूक करणे योग्य नाही. तुमच्यावरील कामाचा ताण अचानक वाढू शकतो. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा त्रासदायक असू शकतो. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्रित राहील. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र राहील. तुम्ही घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अनुकूल परिस्थितीत राहील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आरोग्याच्या तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. करिअर असो, व्यवसाय असो किंवा घरगुती असो, रागाच्या भरात त्याच्याशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका. नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी वागताना आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी चिंतेचा देखील असू शकतो. तुमच्या कामात अपेक्षित यश मिळवण्यात अखेर यशस्वी व्हाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा करणे टाळा. करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. व्यवसायाच्या संदर्भात लांब पल्ल्याच्या प्रवासाला जावे लागू शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा असेल. कोणत्याही क्षेत्रात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी या आठवड्यात तुम्हाला खूप काळजीपूर्वक विचार करावा लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले समन्वय ठेवा.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा दाखवला तर साध्य होणाऱ्या गोष्टींमध्येही अडथळा येऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे. घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळावे. नोकरी करणाऱ्यांनी या आठवड्यात सावधगिरीने काम करावे.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. लोकांशी बोलताना राग टाळावा. कामाच्या ठिकाणी, तुमच्या विरोधकांशी वाद घालण्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)