फोटो सौजन्य- pinterest
ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह अस्त होणार आहे त्या व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास, संवाद, कौशल्य आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होताना दिसून येऊ शकतो. तसेच आर्थिक खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी देखील हा काळ चांगला राहील. यावेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात किंवा प्रवासाच्या योजना आखण्यात अडथळे येऊ शकतात. गुरुवार, 24 जुलै रोजी संध्याकाळी बुध चंद्राच्या कर्क राशीमध्ये अस्त होत आहे. त्याचा परिणाम फक्त राशीवरच नाही तर जग आणि शेअर बाजारावर देखील होताना दिसून येईल. यावेळी आर्थिक निर्णय घेताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे्. बुध अस्ताचा कोणत्या राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या
मेष राशीच्या कुंडलीमध्ये बुध हा तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी असल्याने तो आता या लोकांच्या कुंडलीमध्ये चौथ्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे या लोकांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. तुम्हाला अनेक संधी मिळतील पण अपेक्षित यश मिळणार नाही. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना प्रवास करावा लागू शकतो. तसेच मानसिक त्रास होऊ शकतो.
मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये बुध हा चौथ्या घराचा स्वामी असल्याने तो दुसऱ्या भावात अस्त होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये गोंधळ निर्माण करणारा असू शकतो. नोकरीमध्ये अचानक बदल होऊ शकतात. जे लोक व्यवसायात भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना नुकसान होऊ शकते.
कर्क राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध हा बाराव्या घराचा स्वामी असल्याने तो पहिल्या घरात अस्त होईल. त्याच्या या बदलांचा परिणाम करिअरवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामामध्ये अडथळे येऊ शकतात. व्यवसायामध्ये तोटा जाणवू शकतो.
सिंह राशीच्या कुंडलीमध्ये बुध हा दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी असल्याने तो बाराव्या घरात अस्त करणार आहे. त्यामुळे या लोकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक समस्या येऊ शकतात. तसेच या लोकांना मानसिक ताण देखील जाणवू शकतो. या काळामध्ये व्यवसायात मोठे निर्णय घेणे टाळावे. आर्थिक स्थिती अस्थिर राहू शकते.
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये बुध हा पहिल्या आणि दहाव्या घरात असल्याने तो अकराव्या घरात अस्त होईल. या काळात तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. व्यवसायात निर्णय घेताना घाई करु नका. आर्थिक नुकसान होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक राशीच्या कुंडलीमध्ये बुध हा नवव्या आणि अकराव्या घराचा स्वामी असल्याने तो नवव्या घरात अस्त होईल. याचा परिणाम तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. तसेच तुमच्यावरील मानसिक दबाव देखील वाढू शकतो. मात्र शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)