फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 23 जुलै रोजी चंद्र बुधाच्या मिथुन राशीत संक्रमण करेल आणि या दिवशी बुध ग्रहाचे वर्चस्व राहील. गुरु ग्रहाची चंद्राशी युती होणार आहे. शुक्र उच्च राशीत असल्याने वृषभ राशीमध्ये मालव्य राजयोग तयार होईल. आर्द्रा नक्षत्राच्या संयोगाने हर्ष योग देखील तयार होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नशिबाची साथ मिळेल. मालव्य राजयोगामुळे काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. जाणून घ्या कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. करिअरपासून व्यवसायापर्यंतच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. माध्यम, लेखन, संशोधन, वाचन, संवाद इत्यादी कामांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. करिअर, अभ्यास, व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, लॅब इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तसेच तुम्हाला पैसे कमाविण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमची जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुमच्या सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करत असाल किंवा भागीदारीमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर राहील. नशिबाची आज साथ मिळेल. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
बुधवारचा दिवस मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जे लोक व्यवसाय करत आहे अशा लोकांना आजचा दिवस चांगला राहील. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, ट्रान्सपोर्ट इत्यादी व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)