फोटो सौजन्य- सोशल मीडिया
नवीन वर्ष सुरू झाले असून या वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे आणि शुभ ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषीशास्त्रानुसार, शनिवार 4 जानेवारी रोजी बुध धनु राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक मानले जाते. याशिवाय बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असेही म्हटले जाते. अशा स्थितीत बुध ग्रह 4 जानेवारी रोजी सकाळी 11:55 वाजता धनु राशीत प्रवेश करेल. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींना फायदा होईल, तर काहींना नुकसान सहन करावे लागेल. या राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध राशीतील बदल देखील अनुकूल मानला जातो. संक्रमणादरम्यान कोणतीही मोठी आर्थिक इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. नवीन लोकांशी मैत्री होईल. व्यावसायिकांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होतील.
हस्तरेखाशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन वर्षातील बुधाचे पहिले संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास आणि लाभदायक आहे. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता असतील. पैशाची बचत करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता राहील. प्रवासातून अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
बुधाचे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी देखील विशेष आहे. बुधाच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. बुध संक्रमणाच्या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. सामाजिक कार्यातून मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल.
सूर्यग्रहण संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बुधाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य मजबूत करेल. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता असतील. उत्पन्नाच्या बाबतीतही नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात आर्थिक विस्तार करू शकाल. कुटुंबातील पालकांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. विवाहितांना सासरच्या लोकांकडून अचानक लाभ मिळू शकतो. नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमणही अनुकूल आणि लाभदायक आहे. या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता.
(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)