फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला विशेष महत्त्व आहे. त्याला ग्रहांचा राजकुमार मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध बलवान असतो ते त्यांच्या बुद्धिमत्तेने जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात. त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो आणि लोक त्यांच्यामुळे प्रभावित होतात. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती मजबूत राहील त्या लोकांना स्वतःच्या व्यवसायात यश मिळेल.
पंचांगानुसार बुध ग्रह 14 ते 21 दिवसांनी वेगवेगळ्या राशींमध्ये संक्रमण करणार आहे. दरम्यान बुध ग्रह 2 महिने वेगवेगळ्या राशीमध्ये राहतो. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.47 वाजता बुध ग्रह तूळ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. ज्या ठिकाणी तो सुमारे 20 ते 25 दिवस राहील. बुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमणामध्ये लोकांना आनंद होईल. विवाहितांना मानसिक शांती मिळेल आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल. ऑक्टोबर महिन्यांमध्ये तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता. तसेच हा काळ गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर मानला जाईल. कोणतेही निर्णय घेताना गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांमधील कार्यशैली सुधारेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. त्याचवेळी व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मान सन्मान मिळेल.
तूळ राशीच्या लोकांना बुध ग्रहांचे संक्रमण फायदेशीर राहील. या लोकांमधील आत्मविश्वास वाढेल. या काळामध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही अडथळे येणार नाहीत तर सहकाऱ्यांसोबत संबंध दृढ राहतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे अशा लोकांना अपेक्षित लाभ होईल. भागीदारीमध्ये सामील होण्यामुळे आर्थिक फायदे मिळू शकतात. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता किंवा घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन करु शकता.
बुध ग्रहाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी चांगले राहणार आहे. या राशीतील लोकांचे ऑक्टोबर महिन्यापर्यंत लग्न होऊ शकते. तर हे लोक जोडीदारासोबत वेळ घालवू शकतात. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना आखू शकतात. व्यावसायिकांचा खर्च कमी होईल आणि तुमच्या विस्तारामध्ये वाढ होईल. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांवर मानसिक दबाव येऊ शकतो. त्या समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)