फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 24 ऑगस्टचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी विशेष राहील. आज चंद्र सिंह राशीत संक्रमण करणार आहे. आजचा रविवार दिवस असल्याने आजचा स्वामी ग्रह सूर्य असेल. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे उभयचारी आणि दुरुद्र योग तयार होईल. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात शिवयोग तयार होईल. तसेच सर्वार्थ सिद्धी आणि द्विपुष्कर योग तयार होईल. रविवार असल्याने आजचा दिवस सूर्य देवाला समर्पित राहील. शिवयोग आणि सूर्यदेवाच्या कृपेमुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तसेच कुटुंबामध्ये सुख शांती राहील. रविवारी कोणत्या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होईल, जाणून घ्या
रविवारचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे तुम्हाला फायदे होतील. जर तुमचे कोणते काम प्रलंबित राहिले असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. जर तुम्ही आधी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असाल तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. त्यांनी अभ्यासात आपले लक्ष केंद्रित करावे. कुटुंबातील मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस चांगला राहील. तुम्हाला धाडसी निर्णयांचा फायदा होईल. कठोर मेहनत घेतल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. माध्यमे, संप्रेषण आणि प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. व्यवसायात नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमच्या लहान भावंडांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस चांगला राहील. ज्यामुळे तुम्हाला एखाद्या बाबतीत मध्यस्थी करण्याची ऑफर मिळू शकते. तुमच्या सुखसोयी वाढतील. समाजामध्ये तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. जर तुमच्या नात्यामध्ये मतभेद असतील तर ते आज दूर होतील.
रविवारचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात जुन्या क्लायंटच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा रविवारचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)