फोटो सौजन्य- istock
बुध ग्रह मिथुन राशीमध्ये होता आता तो आज म्हणजे बुधवार, 11 जून रोजी सकाळी 11.57 वाजता आपला मार्ग बदलत आहे. बुध ग्रहांच्या या बदलामुळे काही राशीच्या लोकांना त्याचा लाभ होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवादाचा कारक मानले गेले आहे. बुध ग्रहाचा हा प्रभाव व्यक्तीला व्यक्तीला व्यवसायात आणि शिक्षणामध्ये यश संपादन करुन देतो, असे म्हटले जाते. जेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण होते तेव्हा त्याचा शुभ अशुभ परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होत असतो. त्यामुळे जेव्हा बुध ग्रहाचा उद्य होतो तेव्हा काही राशीच्या लोकांना अनेक समस्येचा सामना करावा लागतो तर काहींना आपल्या कामामध्ये चांगली बातमी मिळते. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांवरील असलेला ताण कमी होतो. परंतु त्याच व्यक्तींना व्यवसायामध्ये फायदा देखील होऊ शकतो. बुध ग्रहाच्या उदयाचा कोणत्या राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या
बुध ग्रहाच्या उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात नवीन संधी मिळून यश प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये काही तरी नवीन करु इच्छिणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना यश मिळेल. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याच्या प्रयत्नांमध्ये असाल तर त्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये कोणत्या जुन्या गोष्टीवरुन समस्या असतील तर त्या सुटतील. वृषभ राशीची लोक आज वाहन देखील खरेदी करु शकतात.
बुध ग्रहाच्या उदयामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. या लोकांच्या नात्यामध्ये कायम गोडवा राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते किंवा तुमच्यावर एखाद्या कामाची नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच कोणी व्यक्ती नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर त्यांची इच्छा पूर्ण होईल. सिंह राशीचे लोक एखादे वाहन किंवा सोने खरेदी करु शकता. तुम्हाला आज कोणतीही मोठी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
तूळ राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या उदयामुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. हे लोक व्यवसायाच्या निमित्ताने परदेश किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करु शकतात. या लोकांना एखाद्या दीर्घकालीन योजनेमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या गुंतवणुकीमुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. या राशीच्या लोकांना लग्नात येणारे अडथळे दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)