
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी आणि कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी पाळले जाते. हे व्रत महादेव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे. प्रदोष काळाच्या वेळी पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि वेदना कमी होतात. महिन्यातून दोनदा प्रदोष व्रत पाळले जाते. या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो आणि भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते. धार्मिक विधी आणि पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो. माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी गुरुवार, 15 जानेवारी रोजी रात्री 8.16 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 16 जानेवारी रोजी रात्री 10.21 वाजता होईल. अशा वेळी माघ महिन्यातील प्रदोष व्रत 16 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.47 ते रात्री 8.29 पर्यंत असेल.
शुक्रवारी प्रदोष व्रत येत असल्याने त्याला शुक्र प्रदोष व्रत म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, शुक्र प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात समृद्धी येते आणि शत्रूंवर विजय मिळतो. यामुळे जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. विशेषतः विवाहित महिला आपल्या पतींना दीर्घायुष्य मिळावे आणि आनंद आणि समृद्धी वाढावी यासाठी हे व्रत पाळतात.
शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि शुक्र देवाला समर्पित आहे. शिवाय, भगवान शिव यांनाही पांढऱ्या वस्तू आवडतात. म्हणून, शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी दूध, दही, पांढरी मिठाई आणि पांढरे कपडे यांचे दान करावेत. तसेच गरजूंना अन्न, फळे, पैसे आणि कपडे दान करा.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि नंतर सूर्यदेवाची प्रार्थना करा आणि उपवास करण्याचे व्रत घ्या. पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करा आणि भगवान शिव यांना पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर महादेवांची पूजा करुन बेलपत्रे, फुले, धूप, दिवे इत्यादी अर्पण करा. प्रदोष व्रताची कथा वाचा किंवा ऐका. पूजेनंतर महादेवांची आरती करा आणि शिव चालिसाचे पठण करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत शुक्रवार 16 जानेवारी रोजी आहे
Ans: माघ महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेले प्रदोष व्रत विशेष पुण्यदायी असून पापांचा नाश आणि मनोकामना पूर्तीचे फळ मिळते, असे मानले जाते.
Ans: या व्रतामुळे आरोग्य, धन, सौभाग्य आणि कौटुंबिक सुखात वाढ होते. तसेच शिवकृपेने संकटे दूर होतात.