फोटो सौजन्य- pinterest
बुध ग्रहाने चंद्राच्या कर्क राशीमध्ये 24 जुलै रोजी संध्याकाळी 7.42 वाजता परिवर्तन केले आहे. आता तो 9 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनापर्यंत याच राशीत राहणार आहे. बुध ग्रहाला शिक्षण, व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्क, आर्थिक बाबी, शेअर बाजार आणि एकाग्रतेचा प्रतीक मानले जाते. त्याच्या या बदलाचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो.
रक्षाबंधनाच्या दिवशी कर्क राशीत बुध ग्रहाच्या संक्रमणाचा अनेक राशीच्या लोकांना शुभ परिणाम होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांची बुद्धिमत्ता आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. या संक्रमणामुळे काही राशीतील लोकांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतात. शिक्षण, व्यवसाय आणि गुंतवणुकीत या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
बुध ग्रहाच्या परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये शुभ परिणाम मिळतील. या राशीच्या लोकांच्या चौथ्या घरात बुध ग्रह असल्याने या लोकांचे प्राथमिक शिक्षण आणि घर आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींमध्ये विशेष फायदे होतील. जर एखाद्याला बऱ्याच काळापासून अनेक समस्या असतील तर ते या काळामध्ये दूर होतील. या काळामध्ये तुम्ही कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढेल. त्यासोबत रिअल इस्टेटशी संबंधित प्रकरणांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे.
बुध ग्रहाचे परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम देतील. कारण बुध ग्रह या राशीमध्ये दुसऱ्या घरामध्ये असल्याने त्याचा या लोकांना फायदा होणार आहे. तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या लोकांना उच्च शिक्षणात विशेष संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. कुटुंबामध्ये असलेले जुने वाद संपतील. तुम्ही काही वस्तूंची खरेदी करु शकता. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.
बुध ग्रहाचे परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या दीर्घकालीन आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायातही तुम्हाला चांगले यश मिळू शकते. कुटुंबातील भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)