फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये नागकेसर वनस्पतीला खूप महत्त्व आहे. मात्र ही वनस्पती महादेवांना खूप प्रिय आहे. जर ही वनस्पती घरात ठेवल्यास व्यक्तीला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रासोबत नागकेसर वनस्पतीला आयुर्वेदात एक चमत्कारिक औषधी वनस्पती मानले जाते. या वनस्पतीच्या वापराने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. असे म्हटले जाते की, नागकेसर वनस्पतीशी संबंधित काही उपाय केल्यास धन आणि समृद्धीची कमतरता राहत नाही आणि जीवनात नेहमीच सुख-शांती राहते. त्याचप्रमाणे या वनस्पतीचा उपयोग ग्रह दोष दूर करण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच आर्थिक स्थिती देखील मजबूत करू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, नागकेसरचा वापर राहू-केतू आणि शनि दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावीपणे केला जातो. शनिवारी नागकेसर फुले स्वच्छ लाल कपड्यात बांधा. त्यानंतर ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि दिवा लावा. असे केल्याने शनि देवाचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याचप्रमाणे राहू-केतू आणि शनि दोषापासूनही मुक्ती मिळू शकते.
जर तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर नागकेसर संबंधित हे उपाय करता येतात. पांढऱ्या कपडामध्ये नागकेसराची फुले, हळदीची गाठ आणि गोमती चक्र घेऊन ती बांधावी. त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी या गोष्टी ठेवावी. असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच आर्थिक समस्यापासून देखील सुटका होते.
सकाळी लवकर उठून आवरुन स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर नागकेसराची फुले आणि त्याच्या बिया देव्हाऱ्यात ठेवाव्यात. काही वेळाने ही फुले बदलत राहावी. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहते.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध आणि गुरु ग्रह कमकुवत असल्यास त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यातून सुटका होण्यासाठी नागकेसर एका लहान चांदीच्या पेटीत भरा. हा उपाय केल्याने बुध ग्रहाचा वाईट परिणाम कमी होऊन तुमची व्यवसायामध्ये चांगली प्रगती होईल.
शनिवारी नागकेसर फुले, लवंग आणि कापूर मिसळून त्यांचा धूप संपूर्ण घरात करावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तसेच, नवग्रह हवनात त्याचा समावेश करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे ग्रहांचे अडथळे कमी होतात आणि मानसिक शांती मिळते.
नागकेसर फुलाचा वापर पूजेमध्ये करणे खूप शुभ मानले जाते. या फुलांचा वापर भगवान विष्णू, श्रीराम आणि महादेवांच्या पूजेमध्ये केला जातो. हा उपाय केल्याने आपल्यावर देवांची नेहमी कृपा राहते, असे म्हटले जाते. तसेच जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात, असे मानले जाते.
ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेदामध्ये नागकेसरी फूल विशेष फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही नागकेसर पावडरचे प्रसाद म्हणून सेवन केले तर ते शरीराच्या अनेक समस्यांपासून आराम देऊ शकते. या फुलांच्या वापरामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ही वनस्पती त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)