बुलेट ट्रेनच्या मार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला
गुजरातमधील वासद येथे मोठी दुर्घटना घडली असून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गातील निर्माणाधीप पूल कोसळला आहे. पुलाच्या मलब्याखाली दबून एका कामगाराची मृत्यू झाला आहे तर २ कामगारांन बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मलब्यात अजूनही काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत असून मजुरांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.
हेही वाचा-Assembly Election : २५०० रुपये, गॅस सिलिंडर आणि रेशन…; INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी
#WATCH | Gujarat: Concrete blocks collapsed at a construction site of the bullet train project in Anand, today. Rescue operations are underway. Anand police, fire brigade officials have reached the spot.
National High Speed Rail Corporation Limited says, “Today evening at Mahi… pic.twitter.com/LapwfEOo5h
— ANI (@ANI) November 5, 2024
दुर्घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. हा पूल बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग असून पुलाचं काम सुरू असताना अचानक पुलाच्या दगडाचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे काही समजण्याआधी पुलाचा भाग कामगारांवर कोसळला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. काही कामगार अजूनही मलब्यात अडकले आहेत.
हेही वाचा-US Election : एकीकडे मतदान तर दुसरीकडे मतमोजणी सुरू; कमला हॅरिस, ट्रम्प यांच्यात काट्याची टक्कर
#WATCH | Gujarat: Concrete blocks collapsed at a construction site of the bullet train project in Anand, today. Rescue operations are underway. Anand police, fire brigade officials have reached the spot.
National High Speed Rail Corporation Limited says, “Today evening at Mahi… pic.twitter.com/LapwfEOo5h
— ANI (@ANI) November 5, 2024
पूल कोसळताना मोठा आवाज झाला. आवाज ऐकून आसपास काम करणारे कामगारांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यातच आलं आहे. घटनास्थळी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्यात.
Gujarat | Today evening at Mahi river at construction site of bullet train project three laborers trapped in between concrete blocks. Rescue operation is in progress using cranes and excavators. One labour has been rescued and has been recovering in the hospital: National High… pic.twitter.com/eJaA9agq9y
— ANI (@ANI) November 5, 2024