INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी
झारखंड निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जनतेला आश्वासने देण्यात येत आहेत. भाजपनंतर आता इंडिया आघाडीनेही निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि JMM चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात 7 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांना दर महिन्याला 2500 रुपये, गरीब कुटुंबांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर आणि 7 किलो रेशन देण्यात येणार आहे.
स्थानिक धोरण आणणे, सरणा धर्म संहिता लागू करणे तसेच प्रादेशिक भाषा आणि संस्कृती जपण्याचा संकल्प करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महिला सन्मानाची हमी : महिला सन्मान योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ पासून महिलांना २५०० रुपये मानधन देण्याचे वचन दिले आहे.
हेही वाचा-“सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्याच…” सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
सामाजिक न्यायाची हमी : एसटी-28 टक्के, एससी-12 टक्के, ओबीसी 27 टक्के आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आणि मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्याचे आश्वासन दिले आहे.
अन्नसुरक्षेची हमी: प्रति व्यक्ती 7 किलो रेशन देण्याचं आश्वासन. याशिवाय राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
रोजगार आणि आरोग्य सुरक्षेची हमी: झारखंडमधील 10 लाख तरुण पुरुष आणि महिलांना नोकऱ्या आणि रोजगार तसेच या हमी अंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंतचा कौटुंबिक आरोग्य विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
हेही वाचा-Assembly Election : २५०० रुपये, गॅस सिलिंडर आणि रेशन…; INDIA आघाडीने झारखंडमध्ये दिल्या ७ गॅरंटी
शिक्षणाची हमी : राज्यातील सर्व भागांमध्ये पदवी महाविद्यालये आणि जिल्हा मुख्यालयात अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रोत्साहन धोरण आणताना राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये प्रत्येकी ५०० एकर क्षेत्रफळाचे औद्योगिक उद्यान निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
शेतकरी हिताची हमी: या हमीमध्ये धान पिकाचा एमएसपी 2400 रुपयांवरून 3200 रुपयांपर्यंत वाढवण्याबरोबरच लाह, टसर, करंज, चिंच, महुआ, चिरोंजी, साल बियाणे इत्यादींच्या समर्थन मूल्यात 50 टक्के वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.