Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri 2026: अष्टमी नवमीला कन्यापूजन करतेवेळी या वस्तूंचे करा दान, तुमच्या इच्छा होतील पूर्ण

चैत्र अष्टमी नवमी तिथीच्या वेळी कन्यापूजनेला जेवण केले जाते. श्रद्धेनुसार फळ, धान्य इत्यादी वस्तूंचे दान केले जाते. आपल्या क्षमतेनुसार कन्यांना भेटवस्तू द्या. कन्यापूजनेवेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 26, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • अष्टमी नवमीला कन्यापूजन का करतात
  • कन्यापूजनावेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे
  • दान करण्याचे फायदे
 

चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजनानंतर उपवास केला जातो. असे मानले जाते की, कन्यापूजना व्यतिरिक्त नवरात्रीचे फळ अपूर्ण मानले जाते. काही जण अष्टमी तर काहीजण नवमीला कन्यापूजन अवश्य करतात. कन्यापूजन करतेवेळी छोट्या मुलींना जेवणासोबत दक्षिणा देण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार अन्न दक्षिणासोबत इतर वस्तू भेट देणे उत्तम मानले जाते. कन्यापूजनादरम्यान काय दान करावे ते जाणून घ्या

विवाहात अडथळा येणाऱ्यांनी श्रृंगाराचे सामान करावे भेट

अष्टमी तिथी किंवा नवमी तिथीला ज्या दिवशी कन्या पूजन करणार आहात त्या दिवशी कन्यांना देवीचे रूप मानून श्रृंगाराचे सामान जसे की बांगड्या, टिकली, लिपस्टिक इत्यादी साहित्य भेट देऊ शकता. जर विवाहमध्ये अडथळे येत असल्यास हा उपाय करता येऊ शकतो. असे केल्याने विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतील. याशिवाय नवमी तिथीच्या वेळी सवाशिणीला श्रृंगाराच्या वस्तू भेट द्या. असे केल्याने शुभ प्राप्ती होते.

Chaitra Navratri 2026: दुर्गाष्टमीला कधी करावे कन्यापूजन, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

आर्थिक प्रगतीसाठी धनाचे दान करा

कन्या पूजनामध्ये कन्यांना धनाचे दान करा. असे मानले जाते की अष्टमी किंवा नवमी तिथीला पाच सात किंवा नऊ मुलींना जेवणासोबत धनाचे दान देखील करावे. असे केल्याने आर्थिक समस्यातून सुटका होऊ शकते आणि घरामध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढतील. सर्वात शेवटी कन्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते.

आरोग्याच्या फायद्यासाठी फळ भेटतात

अष्टमी किंवा नवनीतिथीला कन्यांना नक्कीच फळ भेट द्या. यासाठी केळ, डाळिंब, सफरचंद इतर फळ भेट देऊ शकता. असे म्हटले जाते की घरातील एखाद्याचे आरोग्य बिघडले असल्यास हा उपाय केल्याने फायदा होऊ शकतो. असे जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. शास्त्रामध्ये अन्न धन आणि फळांचे दान करणे उत्तम मानले जाते.

Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, सर्व समस्येतून होईल सुटका

चंद्र मजबूत करण्यासाठी खीर द्या

जर कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकुवत असल्यास कन्या पूजनामध्ये कन्यांना खीर देऊ शकता. पाण्याचा संबंध चंद्राशी आहे. त्यासोबतच मानसिक समस्या आणि तणाव यांसारख्या समस्येपासून आराम मिळतो. पनवे वस्तूंचा संबंध चंद्रासोबत शुक्र ग्रहाची देखील आहे. याप्रकारे बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असल्यास कन्यांना अभ्यासाशी संबंधित वस्तू म्हणजेच वही पेन इत्यादींचे दान करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कन्यापूजन काय आहे?

    Ans: कन्यापूजन हा चैत्र नवरात्रीचा महत्वाचा भाग आहे. हा सण अष्टमी किंवा नवमी दिवशी केला जातो. या दिवशी भगवतीच्या रूपात कन्यांना पवित्र मानून पूजा, अन्न आणि वस्तू देतात.

  • Que: कन्यापूजनाचे काय आहेत फायदे

    Ans: जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक आणि वैयक्तिक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते, पापमोचन होते आणि सुख-शांती मिळते

  • Que: अष्टमी–नवमीला उपवास करावा का?

    Ans: इच्छेप्रमाणे उपवास करता येतो. उपवास करून दान केल्यास अधिक पुण्य मिळते

Web Title: Chaitra navratri 2026 donate these items while performing kanya pujan on ashtami navami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.