फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 4 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे. धार्मिकरित्या पाहिल्या गेल्यास श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व असते. त्यामुळे या दिवसाला ज्योतिषशास्त्रात देखील विशेष महत्त्व आहे. तसे पाहिला गेल्यास आज अनेक शुभ योग तयार होत आहे हा ज्योतिषशास्त्रातील मोठा योगायोग आहे. चंद्राचे संक्रमण देखील त्यातीलच एक आहे. पंचांगानुसार, चंद्र देव वृश्चिक राशीमध्ये असताना अनुराधा नक्षत्रातून ज्येष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र देवाला मानसिक स्थिती, मन, आई, प्रकृती आणि वाणी यांचे प्रतीक मानले जाते. तर बुध देव ज्येष्ठ नक्षत्राचे आणि इंद्र देवाचे स्वामी आहेत. चंद्र देवाचे हे संक्रमण विशेष मानले जात आहे. कारण ज्येष्ठा नक्षत्र हे वृश्चिक राशीमध्ये येते त्या ठिकाणी चंद्र आधीच उपस्थित आहे. अशा वेळी चंद्र पूर्वीपेक्षा जास्त बलवान झालेला आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी चंद्र देवाच्या नक्षत्र संक्रमणाचा लाभ कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या
चंद्राच्या संक्रमणाचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर सकारात्मक पडणार आहे. या लोकांमधील मानसिक ताण कमी होईल आणि जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच नवविवाहित व्यक्तीच्या घरात नवीन सदस्य येऊ शकतो. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना मित्राच्या मदतीने नोकरी मिळू शकते. यामुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तसेच व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. तसेच जुनी प्रलंबित कामे देखील वेळेवर पूर्ण होऊ शकतात.
चंद्राच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. या लोकांच्या जीवनामध्ये मोटे बदल होताना दिसून येतील. ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांच्या संबंधित असलेली चिंता दूर होऊ शकते. विद्यार्थी परिश्रमपूर्वक अभ्यास करतील. नात्यांमध्ये असलेले गैरसमज दूर होऊन नात्यामध्ये गोडवा राहील. व्यापारी वर्गाने गुंतवणूक करण्यापूर्वी कोणाचा सल्ला घेतला असल्यास त्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांची करिअरशी संबंधित कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते.
तूळ आणि वृश्चिक राशीसोबतच कुंभ राशीच्या लोकांना चंद्राच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांनी विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. कर्मचारी आणि दुकानदारांना नशिबाची साथ मिळेल त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळामध्ये तुम्ही नवीन दुकानदारांचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)