फोटो सौजन्य- pinterest
आज 4 ऑगस्ट सोमवारचा दिवस. आज चंद्र वृश्चिक राशीमध्ये असेल आणि आज सोमवार असल्यामुळे आजचा स्वामी ग्रह चंद्र असेल. यावेळी इंद्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. त्यामुळे आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. इंद्र योगा आणि महादेव यांच्या कृपेने कन्या राशीसह काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. यामुळे करिअर आणि व्यवसायात मोठी वाढ होईल. आर्थिक बाबतीत असलेल्या समस्या दूर होतील. सोमवारी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांसाठी सोमवार दिवस शुभ राहणार आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीमध्ये बदली मिळेल. आजचा दिवस तुम्ही कुटुंबासोबत घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असलेले काम मिळाल्याने तुम्ही आनंदात राहाल.
कर्क राशींच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय मध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात नवीन योजना आखू शकतात. चित्रपट, संगीत, कला इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना उद्या एक नवीन ओळख मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय निमित्त तुम्ही बाहेर जाऊ शकता. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शोधलेखन आणि प्रकाशन या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. विशेष करून तुमच्या छोट्या भावडांसोबत वेळ घालवाल. विवाहिक जीवन चांगले राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. त्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठेच्या संबंधित गोष्टीत फायदा होईल. कुटुंबामध्ये सुख शांती राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर राशींच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस सर्वोत्तम राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तसेच तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये सुख समृद्धी नाही. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)