Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या राशीनुसार ‘असा’ निवडा परफ्युम; काय सांगतं ज्योतिष शास्त्र, जाणून घ्या

तुमची रास ही तुमच्या व्यक्तीमत्वावर खूप परिणाम करते, त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाताना इंटरव्ह्युला जाताना कोणत्या प्रकारचा परफ्युम वापरवा हे सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 28, 2024 | 05:31 PM
तुमच्या राशीनुसार 'असा' निवडा परफ्युम; काय सांगतं ज्योतिष शास्त्र, जाणून घ्या

तुमच्या राशीनुसार 'असा' निवडा परफ्युम; काय सांगतं ज्योतिष शास्त्र, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला परफ्युम हा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यामुळे बाहेर जाताना , कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना परफ्युम मारल्याशिवाय कोणीही घराबाहेर जात नाही. बाजारात अनेक प्रकाराची सुगंधी द्रव्ये मिळतात पण कोणता परफ्युम आपल्यासाठी योग्य आहे हे बऱ्याचदा कळत नाही. जर तुम्हालाही हाच प्रश्न पडत असेल तर ज्योतिष शास्त्रात याचं उत्तर दिलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात…

सुगंधी परफ्युम पाहिले की बऱ्याचदा आपल्याला कोणता साजेसा असेल किंवा नेमका कोणता परफ्युम विकत घ्यावा यात गोंधळ उडतो. मात्र ज्योतिष शास्त्राततुम्हाला कोणता परफ्युम साजेसा असेल, याबद्दल सांगितलं आहे.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ही मंडळी मंगळाच्या अधिपत्याखाली असल्याने धाडसी उत्साही आणि तापट स्वभावाची असतात. म्हणूनच यांच्या अंगात उष्णता भरपूर असते.या व्यक्तींना खूप घाम येतो. म्हणून महत्वाच्या कामाला जाताना मेष राशीच्य़ा मंडळींनी मोगऱ्याचा परफ्युम वापरावा. मोगऱ्याच्या सुगंधाने यांना राग नियंत्रणात ठेवणं जमतं. असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं जातं.

वृषभ राशी

वृषभ राशीची माणसं ही स्वभावाने आणि दिसायलाही मोहक असतात. वृषभ रास शुक्राच्या अंबलाखाली येत असल्य़ाने ही माणसं अत्यंत रोमॅंटीक असतात. यांनी कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना चमेलीचा परफ्युम वापरल्यास खूप चांगले परिणाम होतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

मिथुन रास

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीची माणसं अतिशय बुद्धीवान असतात. बुध राशी स्वामी असल्याने यांचं संवाद कौशल्य इतरांना आकर्षित करतं. ज्योतिष शास्त्रानुसार या व्यक्तींनी चमेलीचा परफ्युम वापरल्याने कामाच्या ठिकाणी वरिष्ठ यांच्या कामावर समाधानी असतात. यांना मान सन्मान मिळण्यास देखील मदत होते. असं ज्योतिष शास्त्र सांगतं.

कर्क राशी

कर्क राशीची मंडळी अत्यंत हळव्या मनाची असतात. चंद्रदेव यांचा राशीस्वामी असल्याने कर्क राशीला स्त्रीत्वाची रास म्हणून ओळखतात. ही माणसं चंद्राप्रमाणेच  माणसं शांत असली तरी चंचल स्वभावाची असतात. या माणसांना बऱ्याचदा ठोस निर्णय घेणं जमत नाही. त्यामुळे व्यवहारात किंवा कामाच्या ठिकाणी यांना बऱ्य़ाच समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच या राशीच्या माणसांनी ‘लव्हेंडर फ्लेवर’ असलेला परफ्युम वापरावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

सिंह

सूर्य देव राशीस्वामी असल्याने या मंडळींमध्ये आत्मविश्वासाने जगण्याची धमक असते. या व्यक्ती सूर्यासारख्याच तेजस्वी असतात. यांना समाजात, व्यवसायात मान सन्मान मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार या मंडळींनी ‘चॉकलेट’ किंवा ‘व्हॅनिला’ फ्लेवरचे परफ्युम वापरावेत. त्यामुळे यांच्य़ा व्यक्तीमत्वात चांगले बदल दिसून येतात.

कन्या

मिथुनप्रमाणेच कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ही माणसं अगदी नाकासमोर चालणारी सगळ साध्या स्वभावाची असतात. ही मंडळी भावनाशील असल्याने घर,संसार आणि कुटुंब यांना जास्त प्रिय असते. यांच्या व्यक्तीमत्वाला ‘गुलाब’ किंवा ‘चमेली’चा परफ्युम फायदेशीर ठरतो.

Numerology : जन्मतारीख सांगते तुमचा स्वभाव, अंकशास्त्रानुसार ‘या’ तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लोकप्रिय

तुळ राशी

वृषभेप्रमाणेच तुळेचा स्वामी हा शुक्र ग्रह असल्याने ही मंडळी दिसायला देखणी आणि कलारसिक असतात. ही माणसं त्यांच्या मोहक आणि शांत स्वभावाने इतरांचं लक्ष वेधून घेतात. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींना ‘चॉकलेट’ किंवा ‘चमेली’चा परफ्य़ुम साजेसा ठरतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा काहीसा गुढ असतो. हे सहसा मनातलं कधीच कोणाला सांगत नाही. या राशीच्या माणसांना ‘चंदन’ आणि ‘गुलाबा’चा परफ्युम वापरणं फायदेशीर ठरतं.असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे.

धनू

या व्यक्तींचा स्वभाव निश्चयी आणि संयमी असतो. यांचा गुरु ग्रह यांचा राशी स्वामी असल्याने संयमी आणि आदरयुक्त वागणं हे यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्यं आहे. या मंडळींच्या व्यक्तीमत्वाला ‘चंदन’ ,’चमेली’ आणि ‘मोगऱ्या’चा परफ्युम साजेसा आहे.

मकर

मकर राशीची माणसं संघर्ष करणारी असतात. कष्टाची यांना लाज वाटत नाही. या मंडळींनी ‘कस्तुरी फ्लेवर’ असलेला परफ्युम वापरल्यास यांच्या जीवनात सकारात्मकता वाढीस लागते, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे.

सुकलेल्या तुळशीच्या देठाने ‘अशी’ करा भगवान विष्णूंची पुजा, वास्तूदोष होईल दूर

कुंभ

मकर प्रमाणेच या राशीचा स्वामी देखील शनी ग्रह आहे. ही मंडळी तापट स्वभावाची असतात. तत्वनिष्ठ आणि अभ्यासू वृत्तीचे असतात. म्हणूनच ‘स्मोकी’ आणि ‘इन्टेन्स वूडी’ किंवा ‘अंबर नोट्स परफ्युम’ यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम टाकतात.

मीन

गुरु स्वामी असलेली ही रास जलतत्त्वाची आहे. या राशीची माणसं संवेदनशील मनाची असतात. म्हणूनच यांना कस्तुरी’चा परफ्युम लाभदायी ठरतो.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Choose a perfume according to your zodiac sign know what astrology says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • astrological tips
  • perfume

संबंधित बातम्या

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा
1

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर
2

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण
3

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips :   राशीनुसार ‘असा’  निवडा Perfume ; ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत ‘ही’ खास वैशिष्ट्यं
4

Astro Tips : राशीनुसार ‘असा’ निवडा Perfume ; ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत ‘ही’ खास वैशिष्ट्यं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.