Numerology : जन्मतारीख सांगते तुमचा स्वभाव, अकंशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लोकप्रिय
हिंदू धर्म शास्त्रानुसार ग्रहांचा आणि अंकाचा मानवी जीवनाशीू थेट संबंध आहे. ज्या तारखेला आपला जन्म होतो ती तारीख आणि त्या त्या ग्रहासंबंधित चांगले वाईट परिणाम आपल्यावर होत असतात. चला तर मग जाणून घेऊयात अंकशास्त्रानुसार व्यक्तीला स्वभाव कसा ओळखायचा.
जन्मतारीख 1 आणि 10
ज्यांची जन्मतारीख 1 आणि 10 असते त्यांच्या जन्मतारीखेच्या अंकाची बेरीज 1 येते.त्यामुळे त्यांचा मुलांक हा 1 असतो. 1 मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वामी हा सूर्य आहे. ही मंडळी सूर्यासारखीच अत्यंत तेजस्वी असतात. मुलांक 1 असलेली व्यक्ती अत्यंत स्वाभीमानी असते. त्यांच्या वागण्या बोलण्य़ाचा इतरांवर खूप प्रभाव पडतो. ही माणसांना स्वतंत्र रहायला आवडतं.
जन्मतारीख 2 आणि 11
या माणसांचा मुलांक हा 2 असतो. अंकशास्त्रानुसार यांचा चंद्र स्वामी आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे ही माणसं अत्यंत भाननिक आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. या माणसांना शांतता प्रिय असते. तसंच ही माणसं कोणाचा ही विश्वासघात करत नाही.
जन्मतारीख 3, 12 आणि 21
अंकशास्त्रानुसार मुलांक 3 असलेल्या व्यक्तींवर देवगुरु बृहस्पतींचा प्रभाव असतो. गुरु ग्रहाच्य़ा अंमलाखाली असलेली व्यक्ती अत्यंत ज्ञानी आणि अभ्यासू असते. या लोकांचा दृष्टीकोन अत्यंत विज्ञानवादी असतो. ही माणसं आपलं मत मांडताना त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करतात.
जन्मतारीख 4, 13 आणि 31
या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती 4 राहुच्या प्रभावाखाली येतात. ही माणसं चंचल स्वभावाची असतात. तसंच यांना यांना निर्णय घेताना अनेक समस्या येतात. मुलांक 4 असलेल्या व्यक्तींना इतरांवर वर्चस्व गाजवायला आवडतं. असं असलं तरी या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात.
जन्मतारीख 5 आणि 14
या माणसांवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. मी माणसं बोलण्यात पाटईत असतात. ही माणसं आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर करियरमध्ये यशस्वी होतात.
जन्मतारीख 6, 15 आणि 24
अंकशास्त्रानुसार मुलांक 6 चा अधिपती शुक्र येतो. ही माणसं अत्यंत कलारसिक असतात. ही मंडळी दिसायला सुंदर तर असतातच पण प्रेमाने माणसांची मन जिंकतात.
जन्मतारीख 7, 16 आणि 25
या माणसं केतूच्या अंमलाखाली येतात. ही माणसं विवेकशील असातात यांना दूरदृष्टी असते. ही माणसं धीटाने आलेल्या संकटांना तोंड देतात.
जन्मतारीख 8, 17 आणि 26
शनी ग्रहाच्या अंमलाखाली असलेले ही मंडळी अत्यंत संयमी आणि कर्मावर विश्वास ठेवणारी असतात. यांना कोणतीही गोष्ट सहसा सहजी मिळत नाही, त्यामुळे हे कष्टाला कधीही लाजत नाही.
जन्मतारीख 9, 18 आणि 27
मंगळाच्या अधिपत्याखाली असलेली ही माणसं प्रराक्रमी, धाडसी वृत्तीची असताता. यांना पटकन राग येतो. ही माणसं तापट असल्याने यांना उष्णतेशी संबंधित आजार होतात. यांना शिस्तबद्ध काम करायला आवडतं. ही माणसं अत्यंत त्यांच्या कामाशी प्रामाणिक असातात.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)