सुकलेल्या तुळशीच्या देठाने 'अशी' करा भगवान विष्णूंची पुजा, वास्तूदोष होईल दूर
आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला अनंन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. तुळशीच्या पानांपासून ते मुळांपर्यंत अनेक घटक शरीरासाठी आरोग्यदायी मानले जातात. असं म्हणतात की, तुळस दारात असल्याने घरात येणारी हवा शुद्ध होते. याच तुळशीला हिंदू धर्मात देखील मोठं महत्त्व प्राप्त आहे. भगवान श्री कृष्णांना प्रिय असलेल्या तुळशीला देवीसमान मानलं जातं. हिंदू धर्मात तुळशीची भक्ती भावाने पुजा केली जाते. मात्र बऱ्याचदा काही कारणाने दारातील तुळस सुकते. अशावेळी या सुकलेल्या तुळशीचं काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो, चला तर मग जाणून घेऊयात हिंदू धर्नशास्त्र यावर काय सांगतं ते…
वाढत्या प्रदुषणामुळे किंवा सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी मिळत नसल्याने तुळस सुकते. सुकलेली तुळस दारात ठेऊ नये असं म्हणतात. मात्र हिंदू धर्माप्रमाणे तुळशीमध्ये देवीचं स्थान असल्याने तिला फेकून देता येत नाही. म्हणूनच जर तुळस सुकली असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेऊन पुजा करावी. बऱ्याचदा घरातील नातेसंबंध खराब झालेले असतात. तसंच घरातील खर्च वाढत जात पैसा टिकत नाही. याचं कारण वास्तुदोष असल्याचं हिंदू धर्मात सांगितलं जातं. हाच वास्तुदोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितेलेले आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे सुकलेली तुळस.
नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा या राशींसाठी कसा राहील ते जाणून घेऊया
जर तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर तिची देठ करा त्यांनतर त्याला कापूर किंवा पांढऱ्या धाग्याने गुंडाळून घ्या. त्यावर गायीचं सुपाचे काही थेंब टाका. दिवे लागणीला ही बांधलेली जुडी भगवान विष्णूंच्या समोर अर्पण करुन तिला जाळा. असं केल्याने माता लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा प्राप्त होते. असं म्हटलं जातं.असं केल्याने घरातील धनसंपत्तीत वाढ होते व वास्तुदोश कमी होँण्यास मदत होते, असं हिंदू पुराण शास्त्रात सांगितलेलं आहे.
तुळस दारात असल्याने घरावर देवतांची कृपा प्राप्त होते असं म्हणतात. जर दारातील तुळस सुकली असेल तर तिचे काही देठ गोळा करुन त्याची जुडी तयार करा. ही जुडी दारावर बांधा. तुळशीमध्ये देवतांचा वास असतो. त्यामुळे वाईट शक्तीचा घरात प्रवेश होत नाही असं म्हणतात. घराला नजरदोषापासून वाचविण्यासाठी तसंच सकारात्मक ऊर्जा घरात यावी यासाठी हा तुळशीचा हा उपाय फायदेशाीर ठरु शकतो.
घराच्या कोणत्या दिशेला गणपतीची मूर्ती असावी? जाणून घ्या
याशिवाय सुकलेली तुळस कुठेही फेकू नका. तिला एका पांढऱ्या वस्त्रात किंवा पांढऱ्या धाग्याने गुंडाळा. त्यानंतर तिला नदी किंवा तलावात तिचं विसर्जन करा. यामुळे देवतांची कोप होत नाही. असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)