फोटो सौजन्य- pinterest
आजचा 13 ऑगस्टचा दिवस चंद्र दिवसरात्र मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. आजचा बुधवारचा दिवस असल्याने स्वामी ग्रह चंद्र असेल. चंद्र गुरुपासून चौथ्या घरात असल्याने गजकेसरी योग तयार होईल. तसेच उत्तरभाद्रपद नक्षत्रासोबत त्याचा संयोग होईल. त्यासोबत कन्या राशीमध्ये संक्रमण चंद्राला सप्तमी दृष्टीने राहील त्यामुळे धन योग तयार होईल. तसेच सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग असेल. आज धन योगामुळे तूळ राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना क्षेत्रात सर्वांगीण लाभ मिळतील. तसेच सुख समृद्धी मिळेल. कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहणार आहे. तुम्ही खूप पैसे कमवाल. व्यवसायात पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. त्याचसोबत तुम्ही नवीन ठिकाणी गुंतवणूक करु शकता. समाजामध्ये तुम्हाला पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. कुटुंबामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस उत्तम राहणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील. व्यवसायाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. तुम्ही तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करु शकता. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात असणाऱ्याला अनुकूल परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित निकाल मिळू शकतात. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच वैवाहिक जीवन आनंदी राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी हवे असलेले काम मिळू शकते. ते काम तुम्ही उत्साहाने पूर्ण कराल. व्यवसायामध्ये तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील. तुमचे जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुमच्या कामाबद्दल गंभीर राहाल. तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम कराल, ज्यामुळे तुमच्या यशाची शक्यता वाढेल. तुम्ही नवीन संपर्क बनवू शकाल आणि भविष्यात याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. सर्जनशील काम करणाऱ्या लोकांना अपेक्षित परिणाम मिळू शकतात. कुटुंबात चांगले वातावरण राहील. जोडीदाराशी सुसंवाद राहील. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुम्ही उत्साहाने काम कराल. नवीन योजना राबविण्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. माध्यम, संप्रेषण, प्रकाशन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदे होऊ शकतात. यावेळी कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)