फोटो सौजन्य- pinterest
बऱ्याचदा लोक धनत्रयोदशीला काहींना काही वस्तूंची खरेदी करतात. असे मानले जाते की धनत्रयोदशीला काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तूची खरेदी केल्याने भगवान धन्वंतरींचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतात आणि घरात समृद्धी देखील येते, अशी देखील मान्यता आहे. या दिवशी खरेदीसोबतच धन्वंतरीची पूजा केल्याने सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही खरेदी शुभ मानल्या जातात, तर काही अशुभ मानल्या जातात. कारण याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करु नये, जाणून घ्या
दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. हा सण दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. यावेळी हा सण शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. लोक वर्षभर खरेदी करण्यासाठी या सणाची वाट पाहत असतात. मग ते वाहन असो, जमीन असो, घर असो, दागिने असो किंवा इतर कोणतीही वस्तू असो, असे धनत्रयोदशीला काहीतरी करण्याची परंपरा आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आर्थिक समृद्धी येते. मात्र या दिवशी काही वस्तूची खरेदी करु नये असे देखील सांगितले जाते. अन्यथा देवी लक्ष्मी नाराज होऊन घरावर विपरीत परिणाम होऊ शकतात यामुळे गरिबी देखील येऊ शकते. धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी करु नये, जाणून घ्या
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या वस्तूची खरेदी करू शकता, परंतु तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तूंची खरेदी करणे टाळावे. चाकू, पिन आणि सुया यासारख्या तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे टाळा. धनत्रयोदशीला तीक्ष्ण वस्तू घरी आणणे अशुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, लोखंडाच्या वस्तूवर शनिदेवाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. जर तुम्ही धनत्रयोदशीला खरेदी करत असाल तर लोखंडी वस्तू खरेदी करणे टाळा. असे म्हटले जाते की, धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्याने भगवान कुबेराचा आशीर्वाद मिळत नाही.
धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू टाळाव्यात. असे मानले जाते की धातू दुर्दैव आणते. तसेच काचेचा संबंध राहू ग्रहांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे काचेपासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानले जाते. याशिवाय धनत्रयोदशीला प्लास्टिकचे डबे किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. ज्योतिषशास्त्रात प्लास्टिकला चिरस्थायी संपत्तीचे प्रतीक मानले जात नाही म्हणून धनत्रयोदशीला प्लास्टिकच्या वस्तूंची खरेदी करु नये.
धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण प्रकाश आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात. या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी करणे टाळावे. खासकरुन कपडे, वाहन किंवा सजावटीच्या वस्तू. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)