फोटो सौजन्य- pinterest
भारतात दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजयाचे प्रतीक मानला जातो. हा केवळ दिवे आणि मिठाईचा सण नसून पारंपरिक, रीतिरिवाजांशी, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांशी प्रतिकांशी जोडलेला सण आहे. यावेळी दुकान आणि घरामध्ये सजावट केली जाते. दिवे, रांगोळी आणि फुले यांच्यासोबतच आंब्याच्या पानांपासून बनवलेल्या कमानी देखील सजावटीचा एक महत्त्वाचा भाग मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार, आंब्याच्या पानांपासून बनवलेले कमानी केवळ सौंदर्य वाढवतातच असे नाही तर घरात आणि व्यवसायात सकारात्मक ऊर्जादेखील प्रसारित करतात. मान्यतेनुसार, आंब्याची पाने नेहमीच शुभ मानली जातात आणि ही पाने घरामध्ये ठेवल्याने समृद्धी आणि शांती टिकून राहते. आंब्याच्या पानांचे उपाय जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील मुख्य प्रवेशद्वार आंब्याच्या पानांनी सजवले जाते. मुख्य प्रवेशद्वारातून घरात प्रवेश करणारी ऊर्जा सर्वात जास्त प्रभाव पाडते. ज्यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंब्याच्या पानांच्या माळा लावल्या जातात त्यावेळी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. याचा सकारात्मक परिणाम कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक होतो. यामुळे घरामध्ये शांती आणि आनंद येतो आणि सर्वांना मानसिक समाधान मिळते. तसेच कुटुंबातील सदस्य वाईट नजरेपासून दूर राहतात, अशी देखील मान्यता आहे. आंब्याची पाने हिरवळ आणि ताजेपणाचे प्रतीक आहेत त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि उत्साह येतो.
व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिला गेल्यास आंब्याच्या पानांच्या कमानींना विशेष महत्त्व आहे. हे कमानी दुकाने आणि कार्यालयांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनतात, ज्यामुळे ग्राहकांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते. हे फक्त व्यवसाय वाढीचे लक्षण मानले जात नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि कार्यक्षमता देखील वाढवते.
दिवाळीमध्ये तोरणांची सजावट वातावरण आनंदी आणि मोहक बनवते, ज्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक मेळाव्यांमध्येही वाढ होते. आंब्याची पाने नियमितपणे बदलणे शुभ मानले जाते. कारण ताजेपणा नवीन उर्जेचे प्रतीक आहे आणि जुनी पाने नकारात्मक प्रभाव वाढवू शकतात.
लग्न, पूजा किंवा गृहप्रवेश यासारख्या समारंभाच्या शुभ प्रसंगी आंब्याची पाने शुभ मानली जातात. त्यांच्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही असे मानले जाते. शुभ प्रसंगी त्यांचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा कामात अडथळा निर्माण करण्यापासून रोखते असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)