दिवाळी सणाच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या
कार्तिक अमावस्येच्या रात्रीला दिवाळीचे महापर्व म्हटले जाते कारण या दिवशी राम चौदा वर्षांचा वनवास भोगून आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणसह अयोध्येला परतले. मात्र कार्तिक अमावस्येशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना आहेत, त्या तुम्हाला माहीत आहेत का?
दिवाळीच्या दिवशी प्रभू राम, लक्ष्मण आणि सीताजी १४ वर्षांच्या वनवासातून परतले आणि अयोध्येत आले. त्यानंतर अयोध्येतील लोकांनी दिवे लावून, रांगोळी काढून आणि घरे सजवून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू आहे. पण याशिवाय विविध धर्म आणि देवी-देवतांशी संबंधित घटना आहेत, ज्यांचा दिवाळीच्य सणाशी थेट संबंध आहे. जाणून घ्या दिवाळीच्या दिवशी आणखी काय घडले आणि त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा. (फोटो सौजन्य – iStock)
देवी लक्ष्मीचे आगमन
लक्ष्मी देवी झाली होती प्रकट
पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अनेक रत्ने आणि हलाहल विष बाहेर पडले. माता लक्ष्मी, धनाची देवी, समुद्रमंथनातून देखील प्रकट झाली आणि ज्या दिवशी ती प्रकट झाली तो कार्तिक महिन्यातील अमावस्या दिवस होता. त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा केली जाते.
हेदेखील वाचा – नव्या आठवड्यात येणार आयुष्यात आनंद, वृश्चिकसह 5 राशी होतील मालामाल
नरकासुराचा वध
कार्तिक अमावस्येला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16000 स्त्रियांची मुक्तता केली होती. त्यानंतर या महिलांनी 2 दिवस कैदेतून मुक्त झाल्याचा आनंद साजरा केला. त्यामुळे नरकचतुदर्शीचा दिवस साजरा करण्यात येतो आणि यादिवशी आंघोळ झाल्यानंतर पायाखाली काटलं चिरडून घरात प्रवेश केला जातो. याचाच अर्थ दुष्ट प्रवृत्तीना ओलांडून विजयाच्या दिशेने कूच केले जाते
पांडवाची घरवापसी
पांडवांचीही झाली होती घरवापसी
रामायणानुसार, कार्तिक अमावस्येला प्रभू राम अमावस्येला परतले. त्याचप्रमाणे, महाभारतानुसार, कौरव आणि पांडव यांच्यातील जुगारात पांडव हरले तेव्हा ते 12 वर्ष अज्ञात निवासस्थानात होते आणि कार्तिक अमावस्येला 12 वर्षांचा वनवास संपवून पाच पांडव आपल्या राजधानीत परतले होते तो दिवसदेखील दिवाळी म्हणून साजरा केला जातो असे पुराणात सांगितले जाते.
हेदेखील वाचा – लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मीची आरती करावी की नाही? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत
भगवान महावीर निर्वाण
जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचे निर्वाण किंवा मोक्ष दिवाळीच्या दिवशी झाला. त्यामुळे जैन पंथीयांसाठीही दिवाळी सण अत्यंत महत्त्वाचा आहे. ते या दिवशी भगवान महावीरांचा उद्धार दिवस साजरा करतात.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.