कसे असेल साप्ताहिक राशीभविष्य
ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा खूप खास आहे. हा संपूर्ण आठवडा दिवाळीच्या मोठ्या सणाच्या तयारीत जाणार आहे मात्र नक्की. याशिवाय, ग्रह आणि ताऱ्यांची स्थितीदेखील काही राशींसाठी खास ठरणार आहे. यामुळे 21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024 हा काळ सर्व 12 राशींसाठी खास असणार आहे.
अशा 5 राशी आहेत ज्यांना या आठवड्यात मोठे लाभ मिळू शकतात, तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी या आठवड्यात कोणत्या राशींना लाभ मिळेल आणि कोणी काळजी घ्यायला हवी ते स्पष्ट करून सांगितले आहे. यापैकी तुमची रास कोणती आहे ते तुम्ही जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
मेष रास
मेष राशींच्या व्यक्तीसाठी आठवडा
मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक लाभ होऊ शकतो. तथापि, खर्चदेखील तितकेच लक्षणीय असतील हे लक्षात घ्या. तब्येतीत मोठी सुधारणा होईल. जे लोक काही आजाराने त्रस्त होते त्यांना आराम मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात दान करण्यावर भर द्यावा.
कर्क रास
कर्क राशींच्या व्यक्तीसाठी आठवडा
कर्क राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे आता लवकर पूर्ण होतील. तसंच करिअरमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कर्क राशीच्या व्यक्तींना मागील काही महिने तंगीचे गेले असतील तर त्यांना आता आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेहनत करण्यावर भर द्यावा.
हेदेखील वाचा – Astrology: घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी ‘असा’ करा तुरटीचा वापर
कन्या रास
कन्या राशींच्या व्यक्तीसाठी आठवडा
कन्या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या आता दूर होऊ लागतील. पद, पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल याकडे तुम्ही लक्ष द्या. आतापर्यंत जे काही सहन केलं आहे ते नक्कीच आनंदात बदलेल. अडकलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक बळही मिळेल. तुमच्या मुलांची प्रगती होईल, तुम्ही त्यांना वेळोवेळी साथ द्या.
वृश्चिक रास
वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी आठवडा
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ज्यांचा व्यवसाय आहे अशा व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला आहे. तुमच्या व्यापारात चांगली विक्री आणि नफाही होईल. कुटुंबात शुभ कार्ये आयोजित करता येतील. गेल्या वर्षभरात जो काही त्रास झाला आहे तो त्रास कमी होईल. पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही आणि या महिन्यात बक्कळ पैसा मिळेल
हेदेखील वाचा – मूलांक 7 असलेल्यांना धनप्राप्ती होण्याची शक्यता
मकर रास
मकर राशींच्या व्यक्तीसाठी आठवडा
पद, पैसा आणि प्रगती मिळवून देणारा हा आठवडा आहे. मकर राशीच्या व्यक्तींना दिवाळी बोनस मिळू शकतो. काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे आनंद मिळेल. घरातील वातावरण चांगले राहील. तसंच घरात काही शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. पैसा मिळेल आणि जाईलही पण आनंद टिकून राहील.
या राशींच्या व्यक्तींनी राहावं सावधान
त्याच वेळी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात वृषभ, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या. तसंच त्यांचे खर्च वाढतील, त्यामुळे बजेट तयार करूनच खरेदी करा जेणेकरून तुमच्या मनावर ताण येणार नाही.