फोटो सौजन्य- pinterest
देशभरामध्ये थाटामाटामध्ये गणपती बाप्पाचा सण साजरा केला जातो. यावेळी गणपती बाप्पाची योग्य पद्धतीने पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गणेश उत्सवादरम्यान बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. पंचांगानुसार, यंदा गणेश चतुर्थी बुधवार, 27 ऑगस्ट रोजी आहे. या दिव
स्वप्न शास्त्रानुसार, गणेशोत्सवामध्ये स्वप्नामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन होणे शुभ मानले जाते. असे स्वप्न पाहिल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात आणि शुभ संकेत देखील मिळतात. स्वप्नात गणपती बाप्पाचे दर्शन होण्यामागे काय आहे अर्थ, जाणून घ्या
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1.54 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.44 वाजता होणार आहे. उदय तिथीनुसार, गणेश चतुर्थीचा उत्सव 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
गणेशोत्सवादरम्यान स्वप्नात गणपती बाप्पा दिसत असल्यास ते स्वप्नशास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते. असे स्वप्न पाहिल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे देखील दूर होतात, असे म्हटले जाते.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये गणपती बाप्पा उंदरावर बसलेले दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्हाला संपत्ती आणि काही चांगली बातमी मिळू शकते.
जर तुम्हाला गणेशोत्सवात गणपती बाप्पाची पूजा करताना पाहणे खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न पाहणे म्हणजे जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होणे. यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळू शकतात.
जर तुम्ही स्वप्नात गणपतीला पाण्यात बुडवताना किंवा विसर्जन करताना पाहत असल्यास त्यामागील अर्थ असा होतो की, हे स्वप्न खूप शुभ आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. तसेच त्या व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही.
जर ब्रम्ह मुहूर्तावर गणपती बाप्पाचे स्वप्न पडत असतील तर देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न राहील आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच तु्म्हाला कारकिर्दीत अपेक्षित यश मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)